रा का मिश्र बाहदरपुर महाविद्यालयात प्रफुल्ल बडगुजर याचा प्रथम क्रमांक.
जळगाव येथील श्री.सुदाम शांताराम बडगुजर मुळगाव चिंचोली तालुका यावल यांचा चिरंजीव प्रफुल्ल बडगुजर याने 12 वी सायन्स मध्ये 96.16 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याचे वडील प्राथमिक शिक्षक जि प केंद्र शाळा वावडदा तालुका जिल्हा जळगाव येथे कार्यरत आहेत. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
लहानपणापासूनच शारदेचा वरदहस्त लाभलेल्या या परिवारात प्रफुल्ल चा जन्म झाला. आपल्या हुशारी व चाणाक्ष बुद्धीने त्याने इयत्ता आठवी मध्ये असताना शहरी भागातूनच शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी मध्ये येण्याचा मान मिळविला होता.
इयत्ता नववी मध्ये शिकत असताना महाराष्ट्र राज्य स्तरावर घेतल्या जाणाऱ्या इंग्रजी ग्रामर परीक्षेमध्ये सुद्धा त्याने जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळविला होता.तद्वतच नवोदय विद्यालय भुसावळ यांच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत सुद्धा त्याची निवड झाली होती.
इयत्ता दहावी मध्ये 94.80 % गुण मिळवून तो आर आर विद्यालय जळगाव या शाळेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.
रा का मिश्र विद्यालयात विज्ञान विभागात 96.16 % गुण मिळवून त्याने प्रथम क्रमांक तर मिळवलाच याबरोबरच या संस्थेच्या इतिहासात एक नवीन रेकॉर्ड तयार केले आहे. आतापर्यंत या विद्यालयात केवळ 85% गुण मिळवण्याचा हायेस्ट रेकॉर्ड होता. प्रफुल्ल च्या यशाने हा इतिहास बदलला असून त्याने आगळावेगळा रेकॉर्ड तयार केला आहे. त्याच्या यशात विद्यालयाचे प्राचार्य श्री मधुकर शिवदे सर , श्री सचिन अरविंद बडगुजर सर आणि त्याला शिकविणाऱ्या सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. भावी काळामध्ये आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा त्याचा मानस आहे यासाठी त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
चि. प्रफुल याची मोठी बहीण कु. प्राजक्ता सुदाम बडगुजर ही सुद्धा पुणे येथे उच्च पदावर कार्यरत आहे. तिने भगीरथ हायस्कूल मध्ये 91 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला होता. स्टाफ सिलेक्शन अंतर्गत घेतल्या गेलेल्या कंबाईन हायर सेकंडरी लेवल 2016 या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ती सध्या पुणे येथील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंट आरोग्य योजना या विभागात डिवीजनल क्लर्क म्हणून कार्यरत आहे. तसेच तिला तिच्या कारकिर्दीत अनेक प्रकारची संधी उपलब्ध झाली होती. ग्रामीण डाक सेवक म्हणून सुद्धा तिची निवड झाली होती. रिझर्व बँकेत मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून सुद्धा तिची निवड झाली होती. तर ती केंद्रीय विद्यालयाची लेखनिक परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहे. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये सुद्धा अप्रेंटिसशिप करण्यास ची संधी तिला मिळाली होती. सध्याच्या स्थितीत स्टाफ सिलेक्शन अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कम्बाईन ग्रॅज्युएशन लेवल दोन वर्ष 2019 या परीक्षेची ती तयारी करत असून लवकरच त्यात सुद्धा तिला यश मिळेल यात शंका नाही.
श्री सुदाम बडगुजर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आपला कार्यभाग साधून संसारिक प्रपंच कार्य सिद्धीस नेला आहे. त्या काळामध्ये ग्रामीण भागातून आणि विशेषत: चिंचोली या गावातून बडगुजर समाजातील पहिला प्राथमिक शिक्षक होण्याचा मान मिळविला होता. त्यांच्या या संपूर्ण यशामध्ये त्यांची धर्मपत्नी सौ सुरेखा बडगुजर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक उत्कृष्ट लेडीज टेलर म्हणून नावलौकिक मिळवून त्यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार तर लावलाच त्याबरोबर आपल्या मुलांचे संगोपन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले. या कुटुंबास नेहमी चिंचोली येथील श्री चिंधु संपत बडगुजर (काका)यांचे तसेच कुरहे येथील रा धो. बडगुजर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री निंबा फकीरा बडगुजर ह.मू.चोपडा यांचे आशीर्वाद व सहकार्य लाभत असते.
चिरंजीव प्रफुल्ल बडगुजर याच्या या यशाला अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर नवयुवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व संपूर्ण बडगुजर समाजाच्या वतीने हा मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏 त्याला भावी काळातील यशस्वी वाटचालीसाठी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा यशस्वी भव ! शुभम भवतु. ! 👍👍👍
शब्दांकन प्रा. मिलिंद चिंधु बडगुजर (९४२११८४४९५).





अभिनंदन, व शुभेच्छा
चि प्रफुल्ल सुदाम बडगुजर यांचे अभिनंदन.
सुकुमारी प्राजक्ता यांचेही अभिनंदन.शुभेच्छा!मातापित्याचे अभिनंदन!/
डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती
Congratulations to Prafulkumar& Parent ,Score Keep it up Go Ahead💐👌