श्री. धर्मेद्र आण्णा यांची महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळात कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून निवड – श्री. प्रणव कोठवाल सर फागणे

मुळगांव वाडी, हल्ली मुक्काम शिरपूर येथील श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर
हर हुन्नरी, हजरजबाबी व्यक्तिमत्व, ज्यांची आपल्या आयुष्यात अनेक पदांवर निवड करण्यात आली. पाटबंधारे खात्यात असतांना महाराष्ट्र राज्य मस्टर कारकून संघटनेत धुळे जिल्हा उपाध्यक्ष व शिरपूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली व आदिवासी विकास विभागांत नोकरीस असतांना आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेत नंदुरबार प्रकल्प कमिटी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष व शिरपूर तालुका कर्मचारी संघटनेत अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळ शिरपूर व शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळ उपाध्यक्ष व सचिव म्हणून निवड झाली. श्री चामुंडा माता प्रतिष्ठाण विश्वस्त, अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती उपाध्यक्ष , वधू वर पालक मेळावा सक्रीय योगदान दिले असून आदिवासी विकास विभाग नाशिक आयुत्तालयात मास्टर ट्रेनर म्हणून काम केले. याव्यतिरिक्त त्यांना धार्मिक कार्यात गोडी आहे. शिरपूर शहर वारकरी संप्रदायात त्यांची सदस्य म्हणून काम पाहिले आहे व आता महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. श्री. युवराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांची शिरपूर शहर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळात कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची निवड होणे ही समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

त्यांचा बुके देऊन डॉ. श्री. अतुल बडगुजर, डॉ .सौ. वृषाली अतुल बडगुजर व श्री आशिष पितांबर बडगुजर सर, श्री . किशोर सहादू बडगुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सौ. कल्पना बडगुजर, सौ. जयश्री बडगुजर व श्री. प्रकाश रमेश बडगुजर उपस्थित होते.

श्री. धर्मेद्र आण्णा यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्या बद्दल सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे आणि त्याना पुढील यशस्वी कामगिरी साठी बडगुजर. इन टिमकडून खुप खुप शुभेच्छा 💐🙏🏻

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*