कढोली येथील सधनशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते मा .श्री शरद तुळशीरामशेठ बडगुजर यांची एरंडोल तालुका शिक्षण समन्वय समितीत निवड – प्रा. सुदाम बडगुजर, पुणे

कढोली तालुका एरंडोल येथील मा .श्री शरद तुळशीरामशेठ बडगुजर हे सधन शेतकरी असून मा. श्री गुलाबराव पाटील, मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई तथा पालक मंत्री जळगाव यांच्या शिफारशीने एरंडोल तालुक्यातील प्राथमिक शाळांचे सनियंत्रण व गुणवत्ता वाढीसाठी ग्रामशिक्षण समितीत श्री. शरदशेठ बडगुजर यांची निवड करण्यात आली. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे, त्यांना सर्व अनुकूल वातावरण मिळावे आणि कराेना काळात आपले विद्यार्थी कुठल्याही बाबतीत शिक्षणा पासून वंचित राहू नयेत, यासाठी मा. श्री शरदशेठ बडगुजर यांनी जिल्हा परिषद कढोली शाळेतील सर्व वर्गखोल्या डिजिटल केल्यात. तसेच टीव्ही स्क्रीन वर विविध संकल्पना समजावून देण्यासाठी एक मोठा स्मार्ट टीव्ही शाळेसाठी घेण्यात आला. तसेच शिक्षक पालकग्रामस्थ व गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने जवळजवळ आठ लाख रुपये खर्चून अद्ययावत प्रयोगशाळा देखील तयार करण्यात आली. शाळेचे वॉल कंपाऊंड देखील बांधण्यात आले . कायमस्वरूपी पिण्याचे पाणी विद्यार्थ्यां साठी 24 तास मिळेल अशी व्यवस्था श्री. शरदशेठ बडगुजर यांनी करून दिली.

शाळेचे मुख्याध्यापक अजबसिंग सोनू पाटील गेल्या दहा वर्षापासून द स सोसायटीचे डायरेक्टर आहेत. मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी या शाळेत तयार केले जाते शाळेचे चेअरमन शरद बडगुजर आणि मुख्याध्यापक पाटील सर ही नेहमी आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत नवनवीन उपक्रम राबवीत असतात. सेमी इंग्रजी माध्यम चे वर्ग सुद्धा दोघांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेले आहेत. सतत पाठपुरावा करून दोघांनीही शाळेला क्रीडांगण मिळून दिले. त्यासोबतच शाळेत बाग- बगीचा तसेच लाँन तयार करण्यात आले असुन आजूबाजूच्या पंधरा ते वीस शाळांमध्ये अशा सुविधा नाहीत.
एका छोट्याशा कढोली गावात एक आदर्श जिल्हा परिषद शाळा तयार करण्यात श्री शरद बडगुजर यांचा सिंहाचा वाटा आहे. श्री शरदशेठ बडगुजर हे गेल्या सहा वर्षा पासून जिल्हा परिषद शाळा कढोली चे बिनविरोध अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषद कढोली शाळा अद्ययावत डिजिटल शाळा म्हणून ओळखली जाते.
माननीय श्री गुलाबराव पाटील, मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य मंत्रालय ,मुंबई तथा पालक मंत्री जळगाव यांच्या शिफारशीने एरंडोल तालुक्यातील प्राथमिक शाळांचे सनियंत्रण व गुणवत्ता वाढीसाठी ग्रामशिक्षण समितीत श्री. शरदशेठ बडगुजर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवा समितीतर्फे तसेच बडगुजर.इन टीम आणि प्राऊड ग्रुप तर्फे श्री शरद बडगुजर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

श्री. शरद बडगुजर

1 Comment

  1. खूप छान कार्य , अभिनंदन , असाच उत्तरोत्तर विकास आपल्या हातून होत राहो

Leave a Reply to Dharmendra Badgujar sir Cancel reply

Your email address will not be published.


*