धुळे येथील श्री. सुधाकर भास्कर बडगुजर हे 33 वर्ष अविरत प्रदिर्ध सेवेनंतर सेवानिवृत्त – श्री. मुकेश एकनाथ बडगुजर

वर्शी ता. शिंदखेडा, हल्ली मुक्काम धुळे येथील श्री. सुधाकर भास्कर बडगुजर हे 33 वर्ष अविरत प्रदिर्ध सेवेनंतर दि.30/4/2020 रोजी सेवानिवृत्त झालेत परंतु कोविड 19 मुळे त्यांचा खोळंबलेला सेवानिवृत्ती सोहळा दि.3/7/2021 शनिवार रोजी सोनगीर विद्या प्रसारक मंडळ संचालित, ‘एन्. जी. बागुल हायस्कूल’ सोनगीर येथे थाटात संपन्न झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वर्शी येथे तर माध्यमिक शिक्षण साकळी ता.यावल येथील त्यांचे पाहुणे स्व. एकनाथ डुमणशेठ बडगुजर यांच्याकडे पार पडले. घरच्या साधारण परिस्थितीमुळे उच्च शिक्षण काबाड कष्ट करून धुळे येथील नामांकित कॉलेज एस. एस. व्ही.पी. एस. येथे मराठी विषयात एम.ए. चे आणि एम.ए. राज्यशास्त्र (बहिस्थ) तर ए. वाय. के.के. शिक्षणशास्त्र महाविद्यालय धुळे. येथून बी.एड. चे शिक्षण पूर्ण केले. फेब्रुवारी 1989 मध्ये अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचालित ‘माध्यमिक विद्यालय सांगवी’ शिरपूर येथे उपशिक्षक म्हणून नोकरीस लागले.

नोकरीच्या काळात त्यांनी इमाने इतबारे विद्यार्जनाचे पवित्र काम केले. चांगले विद्यार्थी घडवले. अभ्यासू, व्यासंगी, शिस्तप्रिय, आपल्या विषयात निपूण, असे सरांचे व्यक्तिमत्व आहे. ते आपल्या साकळी येथील बहिण पाहुणे यांना आदर्श मानतात. त्यांनीच सरांच्या आयुष्याला दिशा दिली सर त्यांच्याच ऋणात राहु इच्छितात. त्यांनी समाज कार्यात देखील सहभाग घेतला. त्यांचे सुखी समृद्ध कुटुंब आहे. पुणे येथे दोन मुले इंजिनिअर एक मुलगी जावाई इंजिनिअर आहेत. असा सुखी समृद्ध परिवार आहे. शुभेच्छुक – श्री.रतिलाल भास्कर बडगुजर ( मोठेभाऊ), सौ. ज्योतीताई विजयशेठ पवार (व्याही), सौ. शकुंतलाताई चंद्रकांतशेठबडगुजर(व्याही), सौ.श्वेता विशालराव पवार ( मुलगी – जावाई), सौ. शारदा रमेशशेठ बडगुजर (आतेभाऊ), सौ. मनिषा संजयशेठ बडगुजर (भाचेजावाई), सौ. वैशाली नरेंद्रशेठ बडगुजर (भाचेजावाई), सौ. माधुरी नितिन बडगुजर (भाचेजावाई), सौ. सुनिता किशोर बडगुजर (भाचे), सौ. नलिनी धनंजय बडगुजर (भाचे), सौ. अर्चना उमेश बडगुजर (भाचे), सौ. राजश्री मुकेश बडगुजर (भाचे), सौ.अश्विनी रोहित बडगुजर (भाचे), सौ. रोहिणी विवेक बडगुजर (सून – मुलगा),
सौ. क्रांती संकेत बडगुजर( सून – मुलगा)

श्री. सुधाकर भास्कर बडगुजर यांचा सत्कार करतांना

श्री. सुधाकर भास्कर बडगुजर
मोबा. 9284905562

3 Comments

  1. निवृत्ती नंतरचे भावी आयुष्य सुखी व समाधानी रहावं अशी श्रीचरणी प्रार्थना

  2. आपले उर्वरित आयुष्य निरामय आरोग्यदायी सात्विक समृद्ध असावे हीच प्रभूचरणी प्रार्थना–!!

  3. मला सेवानिवृत्तीच्या आणि आरोग्यदायी निरामय शुभेच्छा दिल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद, नमस्कार!

Leave a Reply

Your email address will not be published.


*