अर्थशास्त्र विशारद, बडगुजर सामाजातील विद्यावैभव डॉ. प्रा. नामदेवराव लक्ष्मण चव्हाण (Prof. N. L. Chavhan Sir) सेवानिवृत्त – श्री. योगेश जाधव सर, चोपडा

एम.ए.(अर्थशास्त्र) एम.फिल,पी.एच.डी. (अर्थशास्त्र) सामान्य जणांच्या कृतीबाहेरचा व कुणालाही अत्यंत रूक्ष व बोजड वाटावा अशा अर्थशास्त्रा सारख्या विषयात संपादन केलेलं हे विद्यावैभव सर्वांनाच हेवा वाटावं असंच असून या ऐवजाचा स्वामी दुसरं – तिसरं कोणी नसून ज्ञानप्रवंत प्राध्यापक विद्यावचस्वती श्री.नामदेवराव लक्ष्मण चव्हाण (एन.एल.चव्हाण सर) हे आहेत. फैजपुर येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात तब्बल ३४ वर्ष अविरतपणे इमानेइतबारे विद्यादानाचं मौल्यावन कार्य करून दि.३१ मे २०२१ रोजी डॉ. श्री.एन. एल. चव्हाण सर सेवानिवृत्त झाले.
भडगांव सारख्या तुलनेने कमी सुविधा असणाऱ्या गावात सरांनी आपलं पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं तद्नंतर जळगांव येथे पदव्यूत्तर शिक्षण घेऊन एम. पिल. अमरावती येथे केले. हा संपूर्ण शिक्षण प्रवास मुळीच फार सोपा नव्हता. पदरी आलेल्या दारिद्र्यावर अनंत अडचणीवर मात करत मार्ग काढत सर मैलाचा एकेक दगड गाठत गेले. शिक्षणाची आस आणि ध्यास घेतलेल्या चव्हाण सरांनी इ. स. २०१३ साली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून विध्यावाचस्वती पी.एच.डी. ही सर्वोच्च पदवी देखील प्राप्त केली. ज्ञानदानाच कार्य अखंडपणे करत असतांंनाच सरांनी केवळ १७ वर्षात अर्थशास्त्र सारख्या विषयावर तब्बल ४१ पुस्तकांचे लेखन केलं आणि ही सारी पुस्तक खूपच वाचनीय आहेत. त्यांचे अनेक शोध निबंध ही प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नियत कालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत तसंच आजतागायत तब्बल ४ विध्यार्थी सरांच्या मार्गदर्शना खाली विद्यावाचस्पती पी.एच.डी. देखील झालेले आहेत. य. च. म. मु. वि. नाशिकचे फैजपूर कॉलेजचे ते केंद्रसंचालक म्हणूनही कार्यरत होते.
ज्ञानोपासनेची व्यासंग अव्याहतपणे जपणाऱ्या श्री. चव्हाण सरांना त्यांच्या ज्ञानप्रमानी कार्याची पावती म्हणून अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेत आहेत त्यातील काही पुढील प्रमाणे.
१)युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या द्वारे –
बेस्ट टीचर अवार्ड
२) वाय. सी. एम. ओ. यु. नाशिक यांच्या द्वारे – बेस्ट कॉऑर्डनियेटर ऑफ स्टडी
३) मराठी अर्थशास्त्र प्रकाशन द्वारे – बेस्ट बुक अवार्ड
४) सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे द्वारे – गुरुवर्य सन्मानपत्र
५) मराठी अर्थशास्त्र प्रकाशन चंद्रपूर द्वारे – सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
चांद्या पासून बांद्या पर्यंत आपली ख्याती आपल्या ज्ञानसाधनेने पोहचविनाऱ्या चव्हाण सरांन कडून मला बरंच काही शिकायला मिळाले फैजपूरला असतांना त्यांची बऱ्याच वेळा भेट होई. तेव्हा प्रत्येक भेटीत तास दिड तास अर्थशास्त्राच्या निरनिराळ्या कंगोऱ्यावर आमची चर्चा नक्कीच होई. आणि या ज्ञानकर्मी असानीच्या सानिध्यात आल्यानं ज्ञान प्राप्तीचा अवर्णनीय आंनद ही मिळे.
नेहमी हसतमुख असणारे सर आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेत त्यांचं पुढचं संपूर्ण आयुष्य असंच निरोगी आणि समाधानाचं जावो ह्याच युवक समिती, प्राऊड ग्रुप व बडगुजर. इन टिमकडून शुभेच्छा.

2 Comments

  1. श्री लोकेश जी आपले मनापासून आभार. आपण समाजातील असे हिरे शोधून काढतात व त्यांच्या जीवनातले रहस्य आपण बातमी या रूपाने समाजासमोर सादर करतात.
    त्याच्यामुळे त्या व्यक्तीबद्दल बडगुजर समाजातील बंधू-भगिनींना माहिती होते .
    असेच कार्य आपण करत रहा मी सुदाम हिम्मतराव बडगुजर पुणे माझ्यातर्फे माझ्या फॅमिली तर्फे व बडगुजर समाजातर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा.

  2. आदरणीय चव्हाण सरांना सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले भावी आयुष्य सुख समृद्धीचे व समाजसेवा करण्यात जावो ही प्रभू चरणी प्रार्थना. समाजातील नवतरुणांना आपण असेच मार्गदर्शन करावे ही अपेक्षा धन्यवाद

2 Trackbacks / Pingbacks

  1. समाजाचे अनमोल रत्न, अर्थशास्त्र विशारद मा .श्री नामदेवराव लक्ष्मण चव्हाण (बडगुजर) सेवानिवृत्तीच
  2. समाजाचे अनमोल रत्न, अर्थशास्त्र विशारद मा .श्री नामदेवराव लक्ष्मण चव्हाण (बडगुजर) सेवानिवृत्तीच

Leave a Reply

Your email address will not be published.


*