नगरपरिषद धरणगांव येथील कर्मचारी श्री. सुरेश रघुनाथ बडगुजर हे सेवानिवृत्त – श्री. योगेश बडगुजर सर पिंप्रि

नगरपरिषद धरणगांव येथील येथील कर्मचारी श्री.सुरेश रघुनाथ बडगुजर हे दिनांक ३१/०५/२०२१ रोजी नियत वयोमानानुसार नगरपालिका पाणी विभागातून प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.कोरोनाच्या कठोर नियमामुळे सेवापूर्ती कार्यक्रम हा लहान व मोजक्या त्यांचा सहयोगी कर्मचारी व नगरपरीषदेचे मुखधिकारी श्री.जनादर्न पवार साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन धरणगांव कार्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. व नगरपरीषदेचे नगरअध्यक्ष श्री.निलेश चौधरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. ह्यांचे मूळ गांव पिंप्रि खुर्द असून ते कामानिमित्त धरणगांव येथे स्थायीक झाले. हे कै. रघुनाथ उखर्डू बडगुजर व कै. द्वारकाबाई रघुनाथ बडगुजर यांचे सुपुत्र, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवनाला सुरुवात झाली त्यांचे शिक्षण हे दहावी पर्यंत शिक्षण झाले आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्या कारणाने ते वेळात वेळ काढून त्यांनी टेलर कामही करत व आपल्या संसारचा उदरनिर्वाह केला.सन १९८४ वर्षी ते रोजंदारी मजूर म्हणून नगरपरिषद येथे पाणी विभागात रुजू झाले व दि.०९/०७/१९८७ रोजी ते कायम स्वरूपी झाले. त्यांना २ मुले १ मुलगी यांना उच्च शिक्षण देऊन उच्च शिक्षित बनविले. जावाई हे श्री.गोपाल दत्तात्रय पवार भुसावळ येथे ऐक्सिस बँकेत नोकरीला आहेत. मोठा मुलगा श्री.सागर बडगुजर यांचे डीप्लोमा इन मॅकनील झाले असून ते हिताची ऑटोमोटिव सिस्टम इंडिया लि.जळगांव कंपनी मध्ये आहेत व द्वितीय चिरंजीव राहुल बडगुजर यांचे शिक्षण DME, BE ( mech Eegg), M.Tech Design Engg (mech) व क्लाॅसेस मधील ८ वर्षा चा अनुभव आहे. त्यांचे धरणगांव व जळगांव येथे नील क्लाॅसेस आहेत यांत ते सर्व इंजीनियरिंग विभागातील विद्यार्थीचे क्लाॅसेस घेतात. व आता आपन बघत आहोत की कोरोना मुळे सर्व अभ्यास क्रम हा ऑनलाइन पद्धतीने शिकविले जातात. चि. राहुल हे घरी राहुन विद्यार्थी याचा अभ्यासक्रम हा पुर्ण करुण घेतला. त्यांनी एक वेब साईट विकसित केली की कोणत्याही क्षेत्रातील इंजियरिंग चा विद्यार्थी हा त्या साईटवर गेल्या नंतर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती भरली की त्या क्षेत्रातील संपुर्ण नोट्स व अभ्यासक्रमा ची परिपूर्ण माहिती उपलब्ध होते व त्यांचे काही चार्ज हे ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतात यामुळे बऱ्याच विद्यार्थी यांना त्यांच्या अभ्यासाच फायदा झाला.
https://neelclasses.com

As following courses as available in the site 12th regular and JEE/CET (PCM Group),Diploma And Engineering All Branch Maths Chapter Wise Notes / Videos And specialized in mechanical / Civil Branch Notes by Chapter for All universities, BSC Maths Notes / videos And Gate Aptitude and maths notes .(ALL UNIVERSITY NOTES & VIDEOS)
Check this website
https://neelclasses.com*
Regards :-*
Neel Class
Mr. Rahul Suresh Badgujar( MECHANICAL ENGG)
Contact :- 9545583393 / 8767346075

नोकरी करून दिनांक ३१/०५/२०२१ रोजी नियत वयोमानानुसार ५८ व्या वर्षी नगरपरिषद सेवेतून सेवानिवृत्त झाल्या मुळे श्री.चिंतामण मोर्या नगर मधील त्यांचे मित्र व सहकारी श्री.रमेश तुकाराम महाजन, श्री. अशोक पाटिल, श्री.महेंद्र पाटिल, श्री.एम. एच. चौधरी, श्री. जे. एच. पाटिल, श्री. राजेंद्र काशीनाथ बडगुजर, श्री. शांताराम मोहकर, श्री. शालिग्राम बडगुजर, श्री. दत्तात्रय पवार यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. व श्री. गंगाराम बारकु मोहकर यांनी शुभ आशिर्वाद दिले. अखिल भारतीय बडगुजर महासमीतीचे अध्यक्ष श्री.माधवराव जानकिराम बडगुजर यांचे ते व्याही आहेत ते ही या प्रसंगी उपस्थित होते त्यांनी ही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

श्री. सुरेश बडगुजर – 9404413200

1 Comment

  1. निवृत्तीच्या व भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*