विवाह समारंभ : नाशिक येथील सौ. गायत्री आणि श्री. महेश रामकृष्ण शेठ बडगुजर यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. का. तृष्णा व नाशिक येथील श्रीमती सुरेखा आणि कै. श्री. नंदकिशोर रामकृष्ण शेठ बडगुजर यांचे सुपुत्र चि. राजन यांचा विवाह सोहळा शुक्रवार दि. २१/०५/२०२१ रोजी सायंकाळी ५.४० मिनिटांनी नाशिक येथे संपन्न.
आजच्या परिस्थितीनुसार पंधरा ते वीस लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला…
सद्यस्थितीत दोन्ही कुटुंबीयांनी घेतलेला स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. असे विवाह सोहळे समाजात अनुकरणीय ठरत आहेत. दोन्ही परिवाराने हा निर्णय घेऊन शासकीय नियमांचे पालन करून एक नव आदर्श घडविला आहे.
श्री. महेश रामकृष्ण बडगुजर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजात विशेष प्रस्थ असलेल्या या कार्यकर्त्याने समाजासमोर शासकीय नियमांचे पालन करत आपल्या मुलीचा विवाह आयोजित करून उत्तम सामाजिक सलोखा जोपसण्याचे उदाहरण सादर केले. तसेच ज्यांना नवदाम्पत्यास आशीर्वाद द्यावयाचा असेल त्यांनी वैयक्तिक फोन किंवा मेसेज व्दारे करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आजचा दिवस हा खरोखर एक अनोखा संगम घेवून आला आहे.!
आजची तारीख आहै २१, आजचा आठवडा आहे २१, आजचे शतक आहे २१, आजचे वर्ष आहे २१.
या सर्वाचा सुंदर मिलाप असलेला शुभ दिवस आहे आज !
उभय नव वधू वरांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
सध्याची भयानक परिस्थितीचा विचार करून आपण हा विवाह समारंभ साधेपणाने मर्यादीत स्वरूपात करण्याचा चा़गला निर्णय घेवून समाजात आदर्श असा पायंडा घालून दिला !
या आपल्या प्रत्यक्ष कृती बद्दल आपले दोन्ही कुटुंबाचे हार्दिक कौतुक व अभिनंदन ! नव वधु वरांस शुभाशिर्वाद ! श्री. रमेश वामनराव बडगुजर, ठाणे यांनी दिले आहेत.
नवरदेव व नवरी च्या कुटुंबातील सर्व सदस्य यांचे अभिनंदन व नवदाम्पत्यास संपूर्ण बडगुजर समाज, युवक समिती व प्राऊड ग्रुप तर्फे मन:पूर्वक शुभेच्छा व सदिच्छा…
वैयक्तिक शुभेच्छा देणेसाठी श्री. महेश बडगुजर – 9822174022 यानंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.


नवदाम्पत्यास हार्दिक शुभेच्छा
Congratulations.
नंदकिशोर रामकृष्ण शेठ बडगुजर हे शासकीय विद्यानिकेतन नाशिकचे विद्यार्थी आहेत का हे कळवणे