मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. अंतर्गत कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन व बियाणे प्रत्यक्षित कार्यक्रम संपन्न- श्री. दिनेश बडगुजर, जळगांव

……….कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन व बियाणे प्रत्यक्षित कार्यक्रम संपन्न………
मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. कढोली यांचे द्वारा कढोली परिसरातील शेतकरी सभासदाना गुणवत्तापूर्वक व माफक दारात रासायनिक खते, बियाणे व रासायनिक औषधे उपलब्ध होणेसाठी कंपनीद्वारा कृषी सेवा केंद्राची नोंदणी करण्यात आली आहे.
दिनांक २१/०५/२०२१ रोजी मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. कढोली द्वारा संचलित कृषी सेवा केंद्राचे शरद बोरसे तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग ,एरंडोल व गावातील प्रगतीशील शेतकरी श्री रमेश आधार पाटील यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तसेच श्री किशोर साळुंखे – मंडळ कृषी अधिकारी, कासोदा यांनी स्थानिक उडीद व मुग या बियाण्यावर बीजप्रक्रिया प्रात्याक्षित करून दाखविले. तर श्रीमती प्राजक्ता पाटील – मंडळ कृषी अधिकारी, एरंडोल यांनी बी उगवण क्षमता प्रात्याक्षित करून दाखविले.
प्रात्यक्षित प्रमाणे जर बीज प्रक्रिया केले तर बियानेची उगवण शक्ती वाढते, बुरशीचा प्रादुर्भाव मर कमी होते तसेच स्थानिक तंत्रज्ञान आधारित बी उगवण क्षमता तपासून बी पेरणी करावी या विषयी श्री शरद बोरसे यांनी उपस्थित शेतकरीना सांगितले

सदर कार्यक्रमास श्री शरद बोरसे तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग एरंडोल , श्री किशोर साळुंखे – मंडळ कृषी अधिकारी, कासोदा, श्रीमती प्राजक्ता पाटील – मंडळ कृषी अधिकारी, एरंडोल, श्री सोनवणे -कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, एरंडोल, मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. कढोली चे संचालक श्री संजय बडगुजर, श्री भास्कर बडगुजर, नाना पाटील, श्री रमेश पाटील, कृषी सेवा केंद्राचे व्यवस्थापक श्री मुकेश पाटील , श्री विकास पाटील व शेतकरी सभासद उपस्थित होते.

1 Comment

  1. जर बळीराजाकडून हवा मेवा|
    तर प्रामाणिकपणे करा कृषिसेवा
    ह्या उक्तीनुसार सर्वांनी सौहार्दापूर्वक कार्य केले तर कृषि प्रधान भारत देश पृथ्वीतलावर एक नंबरचा प्रभावशाली देश बनलेशिवाय राहणार नाही*अभिनंदन* |शुभम् भवतु|

Leave a Reply

Your email address will not be published.


*