सुरत येथील उद्योजक श्री. मुरलीधर नारायण पाटील (M. N. Patil) यांचे कोरोना काळात विशेष कार्य – श्री. मोहन वसंत बडगुजर, सुरत

सुरत येथील अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्टचे उप प्रमुख व सुरत येथील उद्योगपती श्री. मुरलीधर नारायण पाटील (बडगुजर) हे मुळगांव भोकर बादली ह. मु. सुरत येथे वास्तव्यास आहे. यांचे शिक्षण डिप्लोमा इन मैकनिक झाले आहे.यांनी कोरोना काळातील एक समाजाचे व माणुसकी या नात्याने एक असे नाविण्यपूर्व कार्य केले. कोविड-19 कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत बिकट व भयांवह आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहेच की सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण देशावर कसे विचित्र संकट आहे की कोरोना पीड़ित लोकांना ऑक्सिजन चा पुरेसा पुरवठा हा मिळत नसल्याने किती लोकं हे आपले प्राण गमवत आहेत. तरी सध्याची अत्यंत वाईट परिस्थिती ही लक्षात घेता. सुरत येथील नामांकित कंपनी L & T ने ऑक्सिजन जनरेशन युनिटचे ३ सेट तयार करून डोनेट करण्याचे ठरविले आणि हे युनिट तयार करण्याचे काम हे श्री. मुरलीधर नारायण पाटील (बडगुजर) यांच्या जेक्सन इंजिनीअर्स & फेब्रिकेटर्स कंपनी ला आर्डर मिळाली मग संपूर्ण टीम व स्वतः श्री. मुरलीधर पाटील यांनी योग्य नियोजन, ते कामासाठी लागणारे मजूर, साहित्य यांची आखणी व परिश्रम करून कठीण काळात जनतेसाठी हे तयार केले. विशेष एक गोष्ट नमुद करतो की, हे सर्व काम हे बिना मजुरी न घेता फक्त सेवा भावी या उद्देशाने व देशासाठी त्यांनी हे मोलाचे कार्य केले. हे तीनही युनिट काल दि.१६/५/२०२१ वार रविवारी सकाळी १०.०० वा. गुजरात राज्याचे प्रदेश प्रमुख श्री.सी.आर. पाटील साहेब व आरोग्य मंत्री श्री.कुमार कानानी साहेब व इतर मंत्री, कार्यकर्ते व कंपनीचे CEO & MD आणि सर्व स्टाफच्या समक्ष युनिट हे सुरत येथील सिविल हॉस्पिटल १ युनिट, स्मिमेर हॉस्पिटल १युनिट आणि दिल्लीसाठी १युनिट देण्यात आले.
तरी श्री. मुरलीधर नारायण पाटील यांचे देशासाठी, गुजरात राज्यासाठी व बडगुजर समाजासाठी अतिशय मोलाचे, निःस्वार्थ सेवाभावी कार्य केले. त्यांनी या कठीण परिस्थितील सेवा ही अति मोलाची ठरेल त्यांचे कार्य हे आपल्या बडगुजर समाजासाठी ऐतिहासिक ठरेल त्यांना श्री. मोहन वसंत बडगुजर अध्यक्ष अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट सुरत व ट्रस्टचे सर्वे कार्यकर्ते आणि सुरत बडगुजर समाज व युवा संगठण, बडगुजर. इन टिम तर्फे त्यांना मानाचा सेल्यूट…..??

श्री. मुरलीधर नारायण पाटील – ९८७९१०६१२५
९३२७३८०१४०

3 Comments

  1. आदरणीय श्री मुरलीधर पाटील साहेब सुरत यांचे ग्रेट कार्य!
    प्रणाम आपल्याला सर.
    / डॉ दिलीप धोंडू बडगुजर,सौ.स्वाती- अमरावती

  2. Congratulation, Shri. Muralidhar Patil It is really great achievement,and job done by you during this pandemic. I hope you will widely publicized this for commercial scale. It’s required in medical section.
    All the best in further development.
    Regards
    Thanks
    SS kotwal Pune, Nashik 9321341041

Leave a Reply to Dr D D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*