आय. टी. क्षेत्रात सौ. जुईली व श्री. सुनिल गोविंद बडगुजर या बडगुजर दाम्पत्याची उतुंग भरारी – प्रा. मिलिंद बडगुजर, चिंचोली/जळगांव

मुळगाव बहादरपुर तालुका पारोळा येथील श्री गोविंद पुंडलिक शेठ बडगुजर आणि सौ पुष्‍पाबाई बडगुजर यांचे चिरंजीव असलेले श्री सुनील शेठ यांची नुकतीच पुणे येथील पर्सिस्टंट कंपनीत सीनियर सोल्युशन एक्सपर्ट म्हणून निवड करण्यात आली आहे याबद्दल त्यांच्यावर सर्व समाजातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

अत्यंत उच्च सुशिक्षित अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला श्री गोविंद पुंडलिक बडगुजर हे सिनियर अधीक्षक म्हणून जळगाव कोर्ट येथून निवृत्त होऊन जळगाव येथे स्थायीक झाले. घरातील ज्ञानाची परंपरा श्री. सुनील भाऊ यांनी पुढेही चालू ठेवली व आपल्या भावी जीवनात अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी मोलाचा ठसा उमटवला. त्यांचे दहावी व बारावी पर्यंतचे शिक्षण जळगाव येथे झाले. 2004 मध्ये भगीरथ हायस्कूल येथे दहावी मध्येच त्यांनी नाशिक बोर्डातून चौथा क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला. तर 2006 मध्ये एम. जे. कॉलेज जळगाव येथे बारावी विज्ञान शाखेमध्ये सुद्धा नाशिक बोर्डामध्ये 11व्या क्रमांकावर त्यांनी बाजी मारली.

श्री. सुनिल गोविंद बडगुजर

बारावीनंतर डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे त्यांनी बीई कॉम्प्युटर या शाखेत प्रथम क्रमांक मिळविला. परंतु एवढ्यावरच समाधान मानून थांबतील ते श्री. सुनील भाऊ कसले, म्हणून त्यांनी पुढील शिक्षण चालूच ठेवले.

एमबीएसाठी घेतल्या जाणाऱ्या भारतीय राष्ट्रीय स्तरावरील सी एम ए टी (CMAT)या प्रवेश परीक्षेत त्यांनी 99 टक्के गुण मिळवून पुन्हा एकदा आपल्या बौद्धिक संपदेची जाण इतरांना करून दिली. त्यातूनच त्यांनी 2011 मध्ये सिडनहॅम इन्स्टिट्यूट मुंबई येथे दोन वर्षाच्या मॅनेजमेंट कोर्स साठी प्रवेश घेतला.

या प्रदीर्घ अशा शैक्षणिक प्रवासाच्या जोरावर भारतातील सर्वश्रेष्ठ माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवणाऱ्या एन आर नारायण मूर्ती यांच्या ” इन्फोसिस ” या कंपनी मध्ये दीड वर्ष काम करण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला.

यानंतर त्यांनी माहिती तंत्रज्ञान सेवा, तसेच व्यापाराभिमुख प्रणाली प्रदान करणारी सेवा ,आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा करणारी प्रख्यात अशी भारतीय व्यापारी संस्था म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) या कंपनीत विविध पदांवर त्यांनी तीन वर्ष काम केले.

रिअल इस्टेटमधील उच्च कार्यक्षम सॉफ्टवेअर सोल्यूशन अशी कंपनी म्हणजे ” यार्डी ” या कंपनीचे जगभरामध्ये 40 पेक्षा अधिक कार्यालय उत्तर अमेरिका युरोप मध्यपूर्व आशिया ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांमध्ये आहेत. या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अशा कंपनीमध्ये सुद्धा तीन वर्ष काम करण्याचा अनुभव त्यांना प्राप्त झाला.

मध्यंतरीच्या काळात 9 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांचा विवाह अंमळनेर येथील सौ. अनिता बडगुजर व निवृत्त शिक्षक श्री. अशोक राजधर शेठ बडगुजर यांची कन्या जुईली यांच्याशी झाला. सौ जुईली बडगुजर यासुद्धा उच्चशिक्षित बीई (E & TC ) झालेल्या असून गेल्या चार वर्षापासून पुणे येथील इन्फोसिस माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनीमध्ये कार्यरत आहेत.

सौ. जुईली व श्री. सुनिल गोविंद बडगुजर

सुखी वैवाहिक जीवन आणि एकूण सात वर्षाच्या प्रदीर्घ अशा विविध कंपन्यांमधील, विविध पदांवरील, अनुभव विश्व समृद्ध असलेल्या, श्री. सुनील भाऊंना अजूनही शिक्षण घेण्याची आस लागून होती.ज्ञानाची हि लालसा कधीही संपू नये असे त्यांना नेहमी वाटत असायचे. सर्वसामान्य व्यक्ती अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करून स्थिरावला असता. परंतु असे म्हणतात की, “””” योगी आणि ज्ञानी व्यक्तीने एका जागी कधीच थांबु नये”” . असाच काहीसा प्रत्येय त्यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर आपणास आल्या शिवाय राहत नाही.

2020-2021 च्या कोरोणा महामारी च्या पार्श्वभूमीवर वैश्विक स्तरावर घेतल्या जाणाऱ्या एमबीए प्रवेश पात्र परीक्षा म्हणजे जी एम ए टी (GMAT) यामध्ये 670 गुण मिळवून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता(IIM), यांनी राबविलेल्या एका वर्षाच्या पूर्णवेळ असा एम बी एएक्स (MBAEX) प्रोग्राम मध्ये प्रवेश घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित अशा वैश्विक फायनान्शियल टाइम्स ( FT ) ग्लोबल एम बी ए रँकिंगमध्ये भारतातून या इन्स्टिट्यूटने प्रथम क्रमांक मिळवला असून जागतिक स्तरावर 44 वा क्रमांक मिळविला आहे एम बी ए एक्स( MBAEX ) हा मध्यम करीयर व्यवसायिकांना त्यांच्या सध्याच्या कौशल्यांच्या संचांची वाढ करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे कारण ते उद्योगातील जेष्ठ आणि अव्वल व्यवस्थापन भूमिकांसाठी स्वतः चिलखत घेण्याचा प्रयत्न करत असतात

अशा या भारतातील प्रथम क्रमांकाच्या नामांकित MBAEX कोर्ससाठी श्री.सुनील भाऊ यांची निवड झाली. या एका वर्षाच्या कोर्समध्ये त्यांनी फायनान्स टेक्नॉलॉजी आणि जनरल मॅनेजमेंट अश्या विविध विषयांमध्ये खास 5 पैकी 3.5 च्या सीजीपीए म्हणजे एकूण ए ग्रेड सह ते उत्तीर्ण झाले.

नुकतीच त्यांची सीनियर सोल्युशन एक्सपर्ट म्हणून आनंद देशपांडे यांच्या पर्सिस्टंट ( Persistent ) या माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. नोकरीच्या जबाबदाऱ्यांमध्ये आयटी सोलुशन डिझाईन करणे आणि कंपनी साठी आयटी प्रोजेक्टचे कंत्राट मिळवणे समाविष्ट आहे. पर्सिस्टंट ही कंपनी डिजिटल व्यवसायास गती देणाऱ्या धाडसी आधुनिकीकरण आणि भावी पिढीतील अभियांत्रिकी उत्पादन सेवा पुरवणारी अशी नामांकित कंपनी असून या कंपनीचा एका वर्षाचा महसूल जवळपास 500 दशलक्ष डॉलर इतका आहे अशा या प्रतिष्ठित कंपनीमध्ये मानाचे पद मिळणे समाजासाठी गौरवास्पद व भूषणावह आहे. “” निरंतर ज्ञानाची लालसा आणि मेहनत श्रम करण्याची जिद्द यामुळे यश संपादन करता येते””, हा यशाचा मूलमंत्र त्यांनी आपल्या बडगुजर समाजातील तरुणांना दिलेला आहे.

IIM Calcutta Online Certificate

श्री सुनील भाऊ यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, आणि बडगुजर प्राऊड ग्रुप सर्व सदस्य तसेच समाजातील प्रतिष्ठित, सर्व जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तींकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण भावी काळातही समाजाची मान अशीच उंचावत राहोत आणि बडगुजर समाजातील तरुण-तरुणींना योग्य अनमोल बहुमोल मार्गदर्शन देत राहोत या हार्दिक शुभेच्छा .

बडगुजर समाजाच्या वतीने आपणास हा शब्दरूपी मानाचा मुजरा………जय चामुंडा…. जय बडगुजर …..शुभम भवतु.!!!!!!

माहिती दाता:- श्री अशोक राजधर बडगुजर अमळनेर.(9860778929).

शब्दांकन:- प्रा.श्री. मिलिंद चिंधु बडगुजर जळगाव (8999459858)

23 Comments

  1. Shri Sunil Badgujar and Mrs Juili Badgujar Hearty congratulations for our own success in IT field

  2. मान्यवर
    श्री सुनील गो.बडगुजर,चि.सौ.जुईली ताई यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!आपला प्रवास प्रेरणादायी आहे. नमस्कार.
    /डॉ दिलीप धोंडू बडगुजर-सौ‌ स्वाती, अमरावती

  3. Congratulations to Sunilbhau.We are proud of you.Many Many Best Wishes for future.

  4. श्री . सुनिल भाऊ व सौ . ज्युली मॅडम आपले हार्दिक अभिनंदन , असेच उत्तरोतर यश आपणांस मिळत राहो व आपल्या समाजाच्या पताका दाही दिशांना फळकत राहो आपला प्रवास तरूण मुलांना प्रेरणादायी आहे
    श्री . धर्मेंद्र पोपटराव बडगुजर , शिरपूर त्

  5. सुनिल याचे खूप खूप अभिनंदन आणि अशा गुणवंताचा समाजाला अभिमान असावा. सुनिल भावी आयुष्यात नव नविन उत्कर्षाची शिखरे पादाक्रांत करून बडगुजर समाजाचे आणि बहादरपूर गावाचे नाव मोठं करतील हिच अपेक्षा.

    • सुनील भाऊ चे खूप खूप अभिनंदन
      असेच प्रयत्न करत रहा यश मिळत
      राहील आपले गावचे नाव चमकत
      राहील

  6. सुनील भाऊ चे खूप खूप अभिनंदन
    असेच प्रयत्न करत रहा यश मिळत
    राहील आपले गावचे नाव चमकत
    राहील

  7. CONGRATULATIONS SUNIL N JUILI FROM HEMLAL NANDAVE SIR AMALNER WE ARE PROUD OF YOU IN FUTURE YOU GUIDE ALL MERIT STUDENTS FOR SUCCESS LIFE ASSOCIATION OF JUILI WITH YOU HELP U IN THIS PRECIOUS WORK

  8. मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन!! याप्रसंगी एव्हढेच..

    उत्तुंग भरारीवाले श्री.सुनीलजी व सौ.जुईली दाम्पत्त्य l
    नक्कीच त्यांचेपेक्षा सुप्परडुप्पर ठरेल त्यांचे अपत्य ll

  9. आपल्या बडगुजर समाजासाठी आपण खऱ्या अर्थाने समाज भूषण आहात दीपस्तंभ आहात नक्कीच उद्याच्या भावी पिढीला यातून प्रेरणा मिळेल व आपले मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा ठेवतो भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  10. It’s inspirational and motivational for other our Badgujar community people’s who is planning to do MBA in IIM. This count should be increased in our community… 🙂 Specially Thanks to Badgujar.in who is doing great job to reaching everyone and broadcasting such news by Web…keep it up.!!

  11. Sunil tu Samaj Bhushan ahe tujha mala khupach Abhiman vatato tujhe khup khup Abhinandan Ani shubhecha

  12. समाजाच्या दृष्टीने खूप मार्गदर्शक ठरेल असं व्यक्तिमत्व सुनील भाऊंचा यावरून दिसून येते

  13. सुनील तुझ्या यशाबद्दल खूप मला कौतुक व अभिमान वाटतं तुला माझ्या खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा पुढच्या कॅरियर साठी असेच आपले बहादरपूर चे नाव आणि आपल्या बडगुजर समाजाचे नाव जगाच्या पातळीवर आन हीच पुन्हा शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*