श्री. रविंद्र प्रकाश जाधव (बडगुजर) यांचा कोरोना वारियर योद्धा म्हणून सत्कार – श्री. अशोक राजधर बडगुजर, अमळनेर

जळगाव येथील राधाकृष्ण नगर मधील रहिवासी तसेच सध्या शिरुर जिल्हा पुणे येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले श्री. रविंद्र प्रकाश जाधव (बडगुजर) यांचा नुकताच पिंपळे खालसा या गावी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते तर्फे उत्कृष्ट कोरेना वॉरियर म्हणून सत्कार करण्यात आला.

श्री. रविंद्र जाधव यांनी पिंपळे खालसा तसेच आसपासच्या तीन चार गावात कोरोना काळात कर्तव्याला तत्पर मानून वेळेचे बंधन न मानता सर्वतोपरी त्यांनी कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल प्रांत साहेब तसेच तहसीलदार साहेबांनी सुद्धा घेतली. त्यानिमित्त ग्रामस्थांतर्फे छोटासा गौरव लेख म्हणून त्यांचा हा सत्कार करण्यात आला.

श्री रविंद्र जाधव हे प्रकाश तुळशीराम जाधव (सेवानिवृत्त ज्यू वर्क्स मॅनेजर ऑर्डनस फॅक्टरी भुसावळ) यांचे चिरंजीव आहेत. तसेच त्यांचे दोन भाऊ श्री नरेंद्र जाधव आणि राजेंद्र जाधव हे ऑडनस फॅक्टरी भुसावळ येथे सर्व्हिसला आहेत आणि ते सुद्धा शक्य तितकी सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास कोरोना काळत आपली जबाबदारी यशस्वीपणे पुर्ण केल्याबद्दल बडगुजर. इन टिम कडून सलाम.

श्री. रविंद्र प्रकाश जाधव (बडगुजर) सन्मान स्विकारतांना

3 Comments

  1. श्री रविंद्र बडगुजर भाऊसाहेब आपले अभिनंदन!
    श्री अशोक बडगुजर साहेबांचा चांगला लेख./
    डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर अमरावती

  2. श्री रविंद्र भाऊ यांचं मनपूर्वक अभिनंदन शासकीय पातळीवर प्रामाणिक कार्याची पावती मिळतेच त्यांचेही आभार बड गुजर वेब पोर्टल व श्री अशोक बड गुजर यांचेही आभार

Leave a Reply to S J Badgujar. Yawal Cancel reply

Your email address will not be published.


*