कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमविणाऱ्या गरजू समाजबांधवांसाठी सामाजिक फंड किंवा चॅरिटेबल ट्रस्ट उभारणी करावी – ही काळाची नितांत गरज – श्री. आर. बी. चव्हाण सर, कल्याण

                     !!     नम्र विनंती   !!

दि.24.04.21 शनिवार रोजी अ.भा.क.समिती द्वारा वेबिनार च्या माध्यमातून” कोरोना” आजाराने  मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या शेकडो समाज बांधवांना जाहीर श्रद्धांजली  अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन करून मृताम्यांना आदरांजली  व्यक्त केली.

त्याबद्दल आयोजक मोहन शेठ, मदन शेठ, ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या प्रशंसीनीय कार्याची  समाज नोंद घेईलच.

आपण मृतात्मास श्रद्धांजली अर्पण करतो म्हणजे मृत व्यक्ती बद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. श्रध्दांजली देणं  म्हणजे भावनिक जिवंत पणा असणं, हे संवेदनशील मनाचं लक्षण असते.

जेव्हा कुटुंबातील कर्ता कमावता व्यक्ती चे अकस्मात दुदैर्वाने निधन होतं, तेव्हा त्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशा आपत्ती पश्चात ज्यांची सांपत्त्तिक परिस्थिती मजबूत असेल तर उदरनिर्वाहा साठी निदान आर्थिक आधार तरी असतो. पण, दुदैर्वाने काही कुटुंबियांना आर्थिक आधार ही नसतो.

अशा  सर्वस्व हरवलेल्या, गरीब, गरजू  कुटुंबियांना संकट समयी मदत होईल असे विधायक कार्य समाजाकडून अपेक्षित आहे.

आज आपला समाज संघटीत रूप घेतोय, अनेक स्थानिक मंडळं आंणि अ.भा. संस्था व समितीच्या माध्यमातून चॅरिटेबल ट्रस्टच्या  स्वरूपात  किंवा पतसंस्था उभारणी करून गरजूंना मदत करून खर्या अर्थाने “दिलासा ” देता येईल. संवेदनशील वृत्तीत  दायित्व व दातृत्व गुण अभिप्रेत  असतात.

मदत कार्य अनेक प्रकारचे असू शकते, जसे पिडीत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लघु गृह उद्योग, गरजू गरीब व होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा मदत इ.

शाब्दिक व सांत्वनपर “भावपूर्ण श्रद्धांजली ” ने काही अंशी दिलासा देणं, इथपर्यंतच समाज कार्य मर्यादित राहू नये. तर व्यापक स्वरूपात रचनात्मक कार्य व्हावे असे वाटते.

वरिष्ठ, प्रतिष्ठित व प्रगल्भ समाज धुरीण नेतृत्वाने यावर विचार करावा ही विनंती. नाहीतर हळहळ व्यक्त करणं व श्रध्दांजली वाहणे हा फक्त एक औपचारिकता,औचित्याचा भाग असेल.

श्री. रमेश चव्हाण, कल्याण – 9869220773
??

2 Comments

  1. माननीय श्री चव्हाण भाऊसाहेब यांनी आवश्यक सामाजिक विचार मांडले आहेत.
    स्थानिक व वैयक्तिक पातळीवर सुध्दा पुष्कळ दाते हे कार्य करतील हा विश्वास आहे.

  2. बडगुजर वेब पोर्टल टिम चांगल्या सामाजिक विचारांना सोबत घेऊन चालते आहे;हे मान.श्री आर.बी.चव्हाण भाऊसाहेब यांच्या लेखाच्या प्रसिध्दिवरून हे सिध्द होते.शुभेच्छा टिमला. / डॉ दिलीप धोंडू बडगुजर अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*