एक खानदानी, भारदस्त व्यक्तिमहत्व! धुळे येथे संपुर्ण मित्र मंडळी मध्ये “बापू” म्हणुणच प्रसिद्ध. आई वडीलांकडून देणगी रूपात मिळालेले एकत्र कुटुंब, संस्कार, साधेपणा व सर्व बाबतीत टोकाचा प्रामाणिकपणा त्यांचे व्यक्तीमत्व आणखीनच खुलवत असे.
कुठे नव्हता भंपकपणा l
नव्हता अवास्तव दांभिकपणा ll
त्यांच्या सोबत वार्तालाप करतांना संपर्कात आल्यावर मनामध्ये भरत असे तो त्यांचा मेणाहुन मृदु स्वभाव आणि मनाचा साधेपणा!…… संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती नकळत त्यांची कशी आणि कधी होऊन जात असे हे त्या व्यक्तीला कळत सुद्धा नसे.! त्यांच्यात खेळाडूवृत्ती जबरदस्त होती, मनाचा मोठेपणा होता. ते वाणिज्य शाखेत डिग्री शिकत असताना आंतरविद्यापीठ बॉस्केटबॉल खेळामधे ते युनिव्हरसिटी कलर कोट प्राप्त सन्मानित आहेत. जुनी गाणी ऐकण्याचा छंद त्यांनी जोपासला होता. फ़िल्म कलाकार केस्टो मुखर्जी, ओम प्रकाश, असरानी हे त्यांचे आवडते कॉमेडियन (हास्य कलाकार) परीवारातील सर्व सदस्य एकत्र जमल्यावर त्या कलाकारांची मिमिर्की ठरलेली ‘बसन्ती इन कुत्तो के सामने मत नाचना’ किवा ‘हम अंग्रेजों के जमानेके जेलर है’ जसे च्या तसे डॉयलोग नेहमी प्रमाणे असायचेच त्यामुळे त्यांचे दिवसभराचे काम न थकता विनासायस पुर्ण होत असे.
अमरावतीला आले की त्याच्या मामांच्याकड़े व सासुरवाडीला आमच्या सहवासात हलक्या फुलक्या गप्पा मारत व सोबत सर्वाना, त्याच्या क्षेत्रातले मार्गदर्शन करत असत, असा नित्यक्रम आमरावतीला आल्यावर असायचा ते अतिशय कार्यक्षम, प्रामाणिक, मनमिळाऊ व व्यवसायीक वाचन व ज्ञान भांडार असलेलं व्यक्तीमत्व.आप्तेष्ठांसोबत वादविवाद करण्याची एक उत्कृष्ट स्वतंत्र शैली असलेले अमरावतीचे विजय सायकलचे संचालक श्री विजयमामा उर्फ़ दादामामाच्या मार्गदर्शनात त्यांनी सुरूवात धुळे येथे “बडगुजर सायकल स्टोअर्स” रूपात करून अवघ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळविले आपले दोन्ही लहानभाऊ श्री. बबलुभाऊ व नितिनभाऊ याना ह्या व्यवसायात व अनुक्रमे वडिलोपार्जित शेतीत एकत्र कुटूंबाची जबाबदारी पेलून, संपुर्ण खान्देश व महाराष्ट्रात बडगुजर कुटूंबाचे नाव लौकीकास आणले. स्वत: कर्त्वातृने व्यवसाय ऊदयास येऊन सुर्य तेजाप्रमाणे तळपणारं झुंजार व्यक्तिमत्व, व ऐतिहासिक वास्तु आणि ऐतिहासिक घटना, मुखोद्गत असलेलं हे व्यक्तीमत्व, नात्याने मोठे साडु म्हणून व आमचे मोठे भावाप्रमाणे आधारवड असलेलं हे व्यक्तीमत्व आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावुन अचानकपणे त्या यात्रेला निघुन गेलं जेथे परतीच्या वाटाच नसतात. बातमी अतिशय धक्कादायक होती. सुनिलनाना, भाऊ, पंत हे कुटुंबवत्सल आणि जबाबदारीची पुर्णजाण असलेले होते. मुलगा अनुप व रोहित दोघांनाही इंजीनियर बनलेले बघण्याचं स्वप्न साकारलं.
आमच्या संध्याताई साहेबांचा आग्रह त्यांनी कधीच मोडला नाही. सुनिलभाऊ आम्हा सर्वांना तुम्ही आणखी हवे होते काही स्वप्न आयुष्याच्या कॅन्व्हासवर अर्धवट राहिलीत ती पुर्ण व्हायला हवीच होती असं मन आक्रंदुन सांगत आहे. “पण जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला” व “अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी राहिली ती कहाणी” ह्या दोन ओळी कायमस्वरूपी आठवणीत राहतील. आपण आम्हाला अर्ध्यावर सोडुन तुम्ही निघुन गेलात.!
कळते पण वळत नाही अशी आमची स्थिती झाली आहे. कै.सुनिलभाऊ तुमच्या मृतात्म्यास ईश्वर चीरशांती प्रदान करो आणि संपुर्ण कुटुंबावर झालेला आघात तथा दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर आपण सर्वांना प्रदान करो.?.
शोकाकुलः
ॲड.अतुल शामकान्त भेरडे व परिवार,अमरावती.
???????

कै. सुनिल बडगुजर, धुळे

कै.श्री सुनील बडगुजर दादासाहेब यांचे आठवणींत मान्यवर विधिज्ञ अॕड.अतुल भेरडे अमरावती यांनी खुप छान लिहिले आहे.प्रेरणादायी! /डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर, अमरावती
मा. श्री दिलिपभाऊ अापल सहकार्य ने सदर लेखला प्रसिद्ध करता अाले आपले व बडगुजर वेब पोरटल चे मनपुवैक धन्यवाद.