रवंजा ता. एरंडोल : कोरोना काळात आपण डॉक्टर, हॉस्पिटल स्टॉफ आणि सफाई कर्मचारी, पोलिस यांचं कौतुक तर नेहमीच होतांना पाहिले आहे. पण आणखी एक व्यावसायिक जो आपल्या जिवाची बाजी लावून या कोरोनाच्या लढाईत साथ देतो तो म्हणजे अॅम्ब्युलन्सचा (रूग्णवाहिका) ड्रायव्हर. आपल्या समाजातही असे काही अनसंग हिरोज म्हणजे पडद्यामागची हीरोज् खूप आहेत. त्यांची ही ओळख समाजाला झाली पाहिजे म्हणून बडगुजर. इन टिम ही बातमी प्रसारित करीत आहे. एरंडोल तालुक्यातील रवंजा या गावांतील श्री. प्रमोद देविदास बडगुजर वय ३० वर्षे हे १०८ या रुग्णवाहिकेवर पाळधी, ता. जळगांव येथे चालक म्हणून काम करताय. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी अनेक कोरोना रूग्णांना घरून उचलून हॉस्पिटलला पोहोचविण्यात मोलाचं योगदान दिलेले आहे. वास्तविक पाहता डॉक्टरपेक्षा किंवा हॉस्पिटलमध्ये येण्याच्या अगोदर कोरोना रूग्णाचा संपर्क हा अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हरशी येतो .अशा या कठीण काळामध्ये प्रमोद देविदास बडगुजर हे मागच्या तीन महिन्यांपासून आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. १०८ ही अत्यावश्यक सेवा या सेवेत रात्री बेरात्री कधीही कॉल घेऊन पेशंट हॉस्पिटलला पोहोचवावा लागतो. त्यामध्ये कोरोनाचे पेशंट यांना तर खाजगी वाहन मिळतच नाही.तेव्हा अशा या कठीण काळामध्ये प्रमोद आतापर्यंत शेकडो करोणाच्या रूग्णांना वेळेत हॉस्पिटलला पोहोचवून त्यांना जीवदान देण्यात एक महत्त्वपूर्ण दुवा ठरलाय.

कोरोनाच्या या लाटेमध्ये ड्रायव्हर हा उपेक्षित राहिलेला घटक आहे. त्यांचं योगदान खरं पाहिलं तर खूप मोठे आहे. ते पण त्यांच्या परिवाराची पर्वा न करता शेकडो रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवताय. प्रमोद सारखे बरेच अँम्ब्युलन्सचालक आहेत. त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो. आघाडीवर राहून सर्वांना जीवनदान देण्याच्या कामात एक महत्त्वपूर्ण योगदान हे लोक देताय. देव त्यांचं काम पाहतोय म्हणूनच की काय अजूनपर्यंत इतक्या लोकांना प्रत्यक्ष संबंध येऊनही प्रमोद यांचं कुटुंब आणि प्रमोद स्वतः कोरोनाचा संसर्गापासुन लांब आहेत. त्यांचे मोठे बंधु शरद बडगुजर हे निवृत्त सैनिक आणि सध्या पोलिसात नाशिकला असुुन ते पण कोरोनाचा या लढाईत आघाडीवर लढताय. प्रमोद यांचा सेवाभावी कार्याला बडगुजर.इन टिमचा सलाम. प्रमोदच्या पालकांचेही मनापासुन अभिनंदन अन आभार कि जे त्यांचे दोन्ही मुले या लढाईत आघाडीवर लढत असतांना खंबिरपणे त्यांचा पाठीशी उभे आहेत.
या परिवारास हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. अशा या अनसंगहिरोज् ला बडगुजर.इन टिम तर्फे कोरोना सुपर हिरोज् म्हणून संबोधू इच्छिते. धन्यवाद.


श्री. प्रमोद शेठ यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! आभार व त्यांच्या सेवाभावी कार्याला सलाम ! खुप खुप शुभेच्छा ! ???
स्वतःची व परिवाराची काळजी घ्या ! ???