नाशिक येथील कोरोना योध्दा डॉ. कमलेश बडगुजर हे बनले कोरोना रूग्णांचे कोरोना कोच – देतायत कोरोना मुक्तीचे धडे – श्री. दिपक भिका बडगुजर, नाशिक

डॉक्टर देव की दानव. याची प्रचीती आली ती प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत नाशिक शहरातील डॉ. कमलेश बडगुजर यांच्या विषयी आज थोडक्यात लिखाण करावे असे वाटले. नाशिक येथील समृध्दी हास्पिटल डायरेक्टर बॉडीवर आहे. अत्यंत महत्त्वाचे कमी वयात फार मोठी जबाबदारी स्विकारत व जगासमोर उभे राहिलेले आताचे महासंकट विषयी तत्पर सेवा देण्यास सक्षम राहण्याचा जनु चंग बांधला. कोरोना रूग्णांना तत्पर सेवा देता येतील असे अद्ययावत कोविड हॉस्पिटल सुरू केले. गतवर्षापासून बरेच रुग्ण यांना डॉ. कमलेश यांनी उत्तम प्रकारे रुग्णसेवा करत बऱ्याच रुग्णाला उत्तम निरोगी आयुष्य बहाल केले. डॉक्टर कमलेश यांनी मागच्या वर्षी पंचवटी कोविड हॉस्पिटल नाशिक येथील तपोवन येथे सुरू केले… यावेळेस ची लाट खुप मोठ्या प्रमाणात त्यात नाशिक मध्ये पेंशटचे प्रमाण जास्त… बऱ्याच पेंशटचे, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे बेड साठी फोन येत होते पण बेड उपलब्ध नव्हते. त्याकरता त्यांनी जास्त रूग्णांना सेवा देण्यासाठी टिमसोबत चर्चा करून यावर्षी सुशृता कोविड हॉस्पिटल व सेवा कोविड हॉस्पिटल, दिंडोरी रोड नाशिक येथे हे दोन नविन हॉस्पिटल सुरू केलेत.

सविस्तर वृत्तांत देणारा व्हिडीओ

समाज बांधव असो अथवा ईतर समाज प्रती आपल्या पदाचा कधीही गैरवापर न करता. आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. अशाच या योध्दाचा आलेला एक अनमोल अनुभव.

डॉ कमलेश बडगुजर यांच्या विषयी काही दिवसांपूर्वी धुळे येथील सौ. सुनंदा संजय बडगुजर ह्या आपल्या मुलीकडे आल्या असता काही त्रास जाणवू लागला. तपासणी केली असता कोरोना झाल्याचे समजले. परिस्थिती अतिशय बिकट बेड मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत त्यांचे जावई श्री. अनिल भास्कर बडगुजर यांनी ताबडतोब डॉ. कमलेश यांना फोनवरून वार्तालाप केला व परिस्थिती सांगितली. त्यावेळी डॉ. यांनी आपण न घाबरता रुग्णास घेऊन येणे, परिस्थिती पाहता नाशिक शहरात बेड मिळणे अशक्य आहे हे दोन्ही बांधव जाणुन होते, पण शब्द आहे आणि मुख्यत माझे परम कर्तव्य सुध्दा आहे. हा ध्यास मनी ठेवून काही तासांतच डॉ कमलेश यांनी धुळे येथील सौ. सुगंधाताई ना हास्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून पुढील संकट टाळले.

पेशंटचा सिटी स्कोर मध्यम असल्याकारणाने योग्य ट्रीटमेंट करणे हे गरजेचे होते. त्यात रेमडीसीवेअर इंजेक्शन उपलब्ध करून देणे थोडे कठीणच. डॉक्टर कमलेश यांनी प्रयत्न करून हॉस्पिटल व्दारे औषधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. औषध दिल्यानंतर सुध्दा त्यातून फारसा फरक पडत नव्हता, अशावेळी एक धाडसी निर्णय देण्याचे ठरले. पेशंटला प्लाजमा द्यायचा निर्णय. या आजारातून नुकतेच बरे झालेले अमळनेर येथील श्री. किशोर वसंत बडगुजर डॉक्टर यांचे सासरे नाशिक मध्येच होते. त्यांचा ब्लड ग्रुप आणि पेंशटचा ब्लड ग्रुप मॅच झाला म्हणून त्यांना प्लाजमा द्यायला तयार झाले. तातडीने प्लाज्मा उपलब्ध करून दिला व पेशंटला प्लाजमा दिल्यानंतर चांगल्या प्रमाणात फरक जाणवला. आज पेशंट अगदी व्यवस्थित कोरोना मुक्त होऊन आपल्या घरी पोहोचले. तो आनंद आज श्री. अनिल शेठ व त्यांचा परिवार व डॉ. कमलेश यांच्या चेहर्‍यावर जे हास्य दिसत आहे. त्या प्रसंगी, केस होतीच तशी हाताबाहेर गेलेल्या रुग्णास नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करनारा असा असावा……

इतकेच नाही तर पेशंटला ऍडमिट केल्यानंतर पेशंटला लागणारे औषधी उपलब्ध करून देणे, ऑक्सीजन उपलब्ध करून देणे. ही पण फार मोठे कठीण कार्य होते. कारण संपूर्ण देशामध्ये औषधींचा तुटवडा ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता आणि प्रत्येक पेशंट हा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला आरोग्य सेवा पुरवणे हे आद्य कर्तव्य आहे. या तत्वावर कार्य करणारे डॉ. कमलेश व टिम कुठल्याही कामाची तमा न बाळगता ते स्वतः औषध उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीत असत. तसेच ऑक्सिजन साठी विविध लोकांशी संपर्क साधत होते. त्यांना नाशिक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, यशस्वी उद्योजक श्री. प्रभाकर दिगंबर बडगुजर, सिन्नर एमआयडीसी चेअरमन यांनी ऑक्सीजन उपलब्ध करून देण्यास अभूतपूर्व मदत केली तेथे दहा सिलेंडरची मागणी केली होती तेथे पंचवीस सिलेंडर उपलब्ध करून दिले. व वेळोवेळी लागेल तेव्हा ऑक्सिजन उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

डॉक्टर कमलेश यांनी व त्यांच्या टीमने आतापर्यंत आठशे ते हजार कोरोना रूग्णांना यशस्वीरित्या ट्रीटमेंट दिलेली आहे. बरे शे पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तेव्हा त्यांचे मनोबल खालावलेले होते. अशावेळी यांच्या टीमने पेशंटमध्ये आत्मविश्वास जागृत करून त्यांना या आजारापासून मुक्त होण्याचे मंत्र दिले. प्रत्येक पेशंट या आजारातून लवकर कसा बरा होईल यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत.

डॉ. कमलेश बडगुजर, डायरेक्टर,
डॉ. निलेश कुंभारे,
डॉ. मनोज बानाईत,
डॉ. सुबोध कोटुले,
डॉ. अभिजित सोनवणे,
डॉ. पंकज वाल्हेकर,
डॉ. रवि निकम,
डॉ. मनोज देशपांडे, डॉ. रूषिकेश गांगुर्डे इ.
या संपूर्ण टिमचे मनपूर्वक अभिनंदन. कोरोना काळात आपण सर्वांनी केलेल्या रूग्णसेवेसाठी बडगुजर. इन टिम आपणांस सलाम करते. धन्वंतरी प्रभु आरोग्यदायी आयुष्य प्रदान करणारी आपली टिम कडून अशीच आरोग्य सेवा घडत राहो. सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

टिमसोबत डॉ. कमलेश बडगुजर

असेच आपल्या समाजात अजून बरीच डॉक्टर टीम आहे आणि आजच्या परिस्थितीनुसार संपूर्ण टीमने जशी रुग्णांची काळजी घेतली तशीच आपली सुध्दा काळजी घेणे आवश्यक आहे….. त्यामुळे सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करा मास्क वापरा, वेळोवेळी हात धुवा, सोशल डिस्टसिंगचे पालन करा. आपला परिवार आपली जबाबदारी समजून योग्य खबरदारी घ्या.

कोरोना योध्दा डॉ. कमलेश सतीश बडगुजर, नाशिक

1 Comment

  1. अभिनंदन कमलेश शेठ असेच नाव कमव दादा पुढच्या कामासाठी शुभेच्छा

Leave a Reply to Dnyaneshwar Dasharath Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*