आरोग्याची शिदोरी यशाचे द्वारी
नाशिक येथील सुश्रुषा कोविड सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी : डॉ.श्री.कमलेश सतिश बडगुजर व
त्यांच्या सहकाऱ्यांनी कारोना काळातील केलेले कार्य सराहनिय व अभिनंदनीय आहे.
मानवी जीवनात आरोग्य ही सर्वात मोठी धन संपत्ती आहे. म्हणून म्हणतात की काय (आरोग्य
धनसंपदा) या युक्ती प्रमाणे त्याचा प्रत्यय या corona महामरीच्या काळात सर्वांना पहावयास मिळत आहे आरोग्यं धनसंपदा म्हणजे आरोग्याला प्राथमिकता देणे आहे कोरोनाची लक्षण वेळो वेळी बदलत आहेत वैद्यकीय शास्त्र संशोधनात्मक कुशल प्रभावी कार्यकरत आहेत आज विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे आरोग्य सुविधा कमी पडत असल्यामुळे शासन हतबल झाल्याचे दिसून येते आहे यातून मार्ग काढण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
डॉ.श्री.कमलेश बडगुजर हे गेल्या बारा वर्षां पासून ते वैद्यकीय सेवा करीत आहेत कोरोना योध्दांना ते वैद्यकीय व प्रयोगशील मार्गदर्शन करून या महामारीच्या गंभीर परिस्थितीत यशस्वी सेवा देत आहेत. नाशिक येथील सर्व स्तरावर त्यांच्या या कार्याचे कौतुक व समाधान बडगुजर समाजातून व ईतर समाजातून व्यक्त केले जात आहे बडगुजर समाजातील अनेक समाज बांधवांनी आपले अनुभव व्यक्त केले डॉ.कमलेश बडगुजर यांनी या परिस्थितीची दाहकता बघून कोव्हिड सेंटर वाढवून वैद्यकीय बेडस् उपलब्ध करून दिले आहेत वैद्यकीय उपकरणे ऑक्सिजन रेमडिसिवर यांचं योग्य वापर व मार्गदर्शन यामुळे यश मिळत आहे. डॉ.कमलेश बडगुजर यांचं मूळ गांव साकळी ता. यावल जिल्हा जळगांव येथील श्री.सतीश भाऊ पंडितराव बडगुजर निवृत्त माध्यमिक शिक्षक यांचे सुपुत्र आहेत. एका छोट्या गावातून ते नाशिक शहरापर्यंत चा प्रवास अतुलनीय आहे आमच्या सर्व बडगुजर समाजाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.
कोरोना काळात सर्वांनीच आरोग्याबाबत दक्षता घेणे, लक्षण दिसताच वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन डॉ. कमलेश सर यांनी वारंवार केले असून आपण सर्वांनी शासकीय व आरोग्याचे नियम पाळावेत जेणे करून आरोग्य समस्या निर्माण होणार नाहीत सर्वांनी काळजी घ्या, मास्क व सोशल distancing चे पालन करा, पुन्हा एकदा डॉ. कमलेश बडगुजर सर व त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या समाज कार्य बाबत मन:पूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा?????श्री चंद्रकांत पितांबर बडगुजर (सी पी सर),ऐरोली नवी मुंबई.

Leave a Reply