नंदुरबार : गुजरात राज्यातील भरुच येथुन एक कुटुंब फॅमिली सोबत कोलकत्ता या गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करताना कुटुंबातील कर्ता पुरुष यांचे निधन झाले. पुढील स्टेशन नंदुरबार या स्थानकावर त्यांचे पार्थिव उतरविण्यात आले. त्यांचा कुटुंबातील सदस्य यांनी एकच हंबरडा फोडला. यांची माहिती नंदुरबार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पदाधिकारी यांना मिळाली व तात्काळ रेल्वे स्टेशन येथे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचे सांत्वन करीत धीर दिला. त्यांचा मुत्यु हा कोरोना मुळे झाला असे लक्षात आले. त्यांनी त्या मयताच्या कुटुंबाला विश्वासात घेऊन शासकीय नियमानुसार मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले .
कोरोनासारख्या आजारामुळे नाती तुटत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्री. गिरीश बडगुजर व इतर पदाधिकार्यांनी कोरोना बधितांचे अंत्यसंस्कार करून माणुसकीची मिसाल घडविली.
मागील वर्षापासून कोरोनासारख्या आजारामुळे माणसापासून माणूस ही दुरावला जात आहे. कोणी कोणाला भेटत नाही जो तो आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घेतात, अनेक जण कार्यक्रमात ही जात नाही, काही ठिकाणी गरजूंना मदतीची गरज असताना कोरोनाच्या भीतीने मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. कोरोनामुळे आपल्यातील अनेक माणसे हिरावली गेली या सर्व बाबींना अपवाद वगळता नंदुरबार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली. त्या कुटुंबाचे दुःख बघवत नसल्याने काही जणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांतप्रचारक तथा कोलकत्ता प्रांताधिकारी यांना कळविल्याने त्यांनी लागलीच नंदुरबार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण नंदुरबारजिल्हा कोविड सेवा समितीचे श्री. गिरीष बडगुजर यांना फोन द्वारे माहिती दिली. लगेचच बडगुजर यांनी पदाधिकाऱ्यांसह नंदुरबार रेल्वे स्थानक येथे आले व मृत व्यक्तीचा पार्थिवाजवळ त्याची पत्नी व लहान मुलेरडत असल्याने स्वयंसेवक संघाच्या सदस्य यांनी धीर देत सांत्वन केले. मयत व्यक्तीचा लहान भाऊ हे पुण्याहून नंदुरबारला येण्यासाठी निघाले आहेत हे कळताच त्यांच्याशी संपर्क केला व सांगितले की आपल्याला यायला १० ते १२ तास लागतील मग त्यांनी मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी असे त्यांच्या मयताच्या भावाला तसेच मयताच्या पत्नीलाही विश्वासात घेत मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली सदर व्यक्तीचा कोरोनामुळे झालेला असल्याने शासकीय नियमानुसार त्याचे पार्थिव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याणचे सदस्य यांनी पार्थिव हे समशन भुंमित शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच मयताच्या पत्नी व मुलांची नंदुरबार रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचारी यांनी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. नंतर त्या परिवाराला त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था ही करण्यात आली.
श्री. गिरीष बडगुजर यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे माणुसकीच्या मिसाल निर्माण केली आहे. अशा या निर्धास्त सामाजिक कार्यकर्त्यांंना बडगुजर. इन टिमचा सलाम…

नंदुरबार मध्ये कार्यकर्ते गिरीश बडगुजर यांना कोरोनाच्या महामारी च्या काळात एका अनोळखी कुटुंबाला मदत करून माणुसकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. गिरीश बडगुजर यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे गिरीश बडगुजर यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा
शुभेच्छुक सुनील मधुकर उल्हासनगर
कुठलाही बडेजाव न करता संपूर्ण समाज(व्यापक अर्थाने) हेच आपले कुटुंब समजून त्याची आत्मीयतेने काळजी घेण्याचे संस्कार रा.स्व.संघाकडून केले जातात. ह्यामुळेच देशभरात असे लाखो, असंख्य ज्ञात-अज्ञात सेवाकार्य संघ स्वयंसेवक पार पाडीत आहेत.