तळेगांव (पुणे) येथील श्री.युवराज भिका बडगुजर यांनी केले विक्रमी ४० वेळा रक्तदान – चि. विशाल बडगुजर उधना (सुरत)

धुळे,कापडणे येथील: सौ.भारती भिका बडगुजर व श्री.भिका नारायण बडगुजर यांचे द्वितीय सुपुत्र श्री.युवराज भिका बडगुजर हे ह.मु.तळेगांव (पुणे) येथे वास्तव्यास आहेत यांना एक मुलगा व एक मुलगी, छोटे कुटुंब सुखी परिवार असा
छान लहानसा परिवार आहे.


श्री. युवराज भिका बडगुजर हे स्वतः रक्त पेढी मध्ये नोकरी करतात व यांना रक्ताची गरज काय असते व त्याचे महत्व हे परीपूर्ण ज्ञात आहे. प्रथम हे पिंपरी सिरॉऑजीकल रक्तपेढी येथे ८ वर्षे व पिंपरी चिंचवड येथे ४ वर्षे काम करत आहे.यातूनच त्यांनी रक्तदानचे अनेक शिबीरांचे आयोजन ते व त्यांची संस्था हे करतात यातूनच त्यांनी एक नाही तर तब्बल चाळीस वेळा विक्रमी रक्तदान केले असून हे बडगुजर समाजासाठी एक प्रेरणादायी व रेकॉर्ड असेल असे मला वाटते.
श्री.युवराज यांनी प्रथम सन २०१० मध्ये रक्तदान केले व असे करता करता ते दर वर्षी २ ते ३ वेळा रक्तदान करत असताना आता पर्यत ४० वेळा रक्तदान करण्याचा विक्रमच म्हणावा लागेल. ते आपल्या समाजासाठी बधुं आणि भगिनींचा व इतर समाज बांधवांचा यांना फोन आला की निस्वार्थ पणे मदत करतात.असेच समाज कार्य आपल्या कडून घडत राहो व बडगुजर समाज , नवयुवक, युवती यानां प्रेरणादायी ठरत असून श्री.युवराज भाऊ यांना पुढील समाज सेवेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! कुलस्वामिनी श्री. चामुंडा मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो.
कोरोनासारख्या आजारामुळे रक्तदानची कमतरता व रक्त पुरवठा कमी झाला आहे. १८ वर्षा वरील सर्व व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे तरी आपण लसीकरण अगोदर रक्तदान करावे व नंतर लस घ्यावी असे आवाहन करत आहे यामुळे रक्ताची कमतरता ही भासणार नाही.

खबरदारी म्हणून १८ वर्षा वरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, योग्य ती काळजी घेणे, शासकीय नियमांचे पालन करा, मास्क वापरा, वेळोवेळी हात धुवा, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि या आजारा पासून सुरक्षित व कोरोना मुक्त होऊया.

“वेळोवेळी रक्तदान करा हेच सर्वश्रेष्ठ दान आहे”

श्री. युवराज भिका बडगुजर – 92243 89836

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*