नाशिक येथील श्री.सागर किशोर बडगुजर याने जाणिले”रक्तदान हेच जीवनदान” चे महत्त्व – श्री. संदीप कोतवाल नाशिक

नाशिक : वसा जनसेवेचा युवासेना नाशिक समाजसेवक स्व. शंकरराव निवृत्तीराव बर्वे सेवाभावी संस्था यांच्या वतीने व मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सध्या राज्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेत “रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान “, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या सेवाभाव वृतीने शासनाचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी नाशिक येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते श्री.सागर किशोर बडगुजर नाशिक (पंचवटी ) यांनी आज रक्तदान करुण आपली सामाजिक बांधिलकी जपली ….

रक्तदान करतांना सागर बडगुजर

श्री.सागर बडगुजर हे श्री. किशोर भिका बडगुजर यांचा चिरंजीव आहे व नाशिक येथील कुलस्वामिनी चामुंडा माता युवक मित्र मंडळा चे माजी अध्यक्ष श्री.दिपक भिका बडगुजर यांचा पुतण्या आहे. समाजसेवेचा वसा हा घरातून च असतो.
आज आपन सर्व बघत आहोत की कोरोना आजारामुळे रक्त हे उपलब्ध होत नाही किंवा फार कमी प्रमाणात साठा आहे तरी आपन सर्व समाज बांधव यांना विनंती जिथे जिथे आपल्या जवळ पास, गांवात शहरात , रक्तदान शिबिर असेल तर आपन रक्तदान करावे. यामुळे रक्ताची कमतरता भासणाऱ नाही व एका व्यक्तीचेही प्राण आपन वाचवु शकतात. असे आवाहन सागर बडगुजर याांनी केलेे आहे. अशा या युुवा कार्यकर्त्याच्या दिलदारकीस बडगुजर. इन टिमचा सलाम.

रक्तदान करा, सोशल डिस्टसिंगचे पालन करा. मास्क वापरा.
या शिबिरात कोरोना चे सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन केले गेले त्याबद्दल सर्व आयोजक टिमचे व रक्तदान करणाऱ्याचे बांधव याचे अभिनंदन …!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*