अभिनंदन !!!
नंदुरबार येथील श्री.राजेंद्र कौतिक नंदवाळकर सेवानिवृत्त एस. टी. महामंडळ(मुळगांंव-फागणे) व सौ.मीना रा.नंदवाळकर माध्यमिक शिक्षिका यांचा मुलगा डॉ.रोहितकुमार हा बी.ए.एम.एस. एम. डी. मेडिसीन चे प्रथम वर्ष नाशिक येथून उत्तीर्ण झाला. चि.रोहितकुमार यास लहानपणापासूनच अभ्यासाची आवड,स्वयंअध्ययनावर भर असल्याने कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यात त्याने प्राविण्य मिळवले.तसेच त्याने इ.10 वी व 12 वी त सुद्धा गुणवत्ता यादीत स्वतःचे नाव कोरले होते. संस्कृत सारख्या विषयात पैकी च्या पैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले होते .पुढे उच्च शिक्षणात मी डॉक्टरच होणार हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन तयारी केली. बी.ए.एम.एस.चे शिक्षण केदारी रेडेकर कॉलेज कोल्हापूर येथे केले. तिथेही दरवर्षी तो गुणवत्ता यादीत आला. पुढे एम .डी. ला नाशिक येथे नंबर लागला. आईवडील यांचे कष्ट, मार्गदर्शन, प्रेरणा यामुळेच मी यश संपादन केले असे डॉ.रोहितकुमारने मनोगत व्यक्त केले. त्याच्या यशा बद्दल परिसरात, समाजात,नातेवाईकांत कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस युवक समिती व प्राउड ग्रुप तर्फे शुभेच्छा.


अभिनंदन आपले डॉ रोहित सर.
मातापिता यांचे अभिनंदन! शुभेच्छा!
बडगुजर वेब पोर्टल टिम चे अभिनंदन!