विवाह हा एक संस्कार सोहळा – चि. सौ. का. डॉ. चारूस्मिता आणि चि. डॉ. जतिन बडगुजर यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा – श्री. सुरेश शिवराम महाले, भुसावळ

विवाह हा एक संस्कार आणि सोहळा देखील आहे. लग्न सोहळा मुळे वधू वरास सोबतच दोन कुटुंब एकत्र येतात. एखाद्याचं लग्न ठरलं की, त्यांच्या कुटुंबात बरोबरच जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या आनंदाला पारावार राहत नाही.

आज आमचे नवी मुंबई येथील उद्योगपती व सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे महासमितीचे उपाध्यक्ष श्री. भगवान लक्ष्मणशेठ बडगुजर यांची सुकन्या चि. सौ. का. डॉ. चारूस्मिता आणि सिडको मधील वरिष्ठ अभियंते नेरुळ येथील श्री. वासुदेव लक्ष्मणशेठ बडगुजर यांचे सुपुत्र चि. डॉ. जतिन यांचा विवाह सोहळा आज गुरुवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी काकाजी वाडी मेरेज हॉल, नविन पनवेल येथे संपन्न झाला.

चि. सौ. का. चारूस्मिता व चि. डॉ. जतिन यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. अतिशय शांत आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमांमध्ये सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले आणि दिलेल्या वेळेत सर्व विधी उरकवून अतिशय हर्ष उल्हासाच्या वातावरणात हा सोहळा नविन पनवेल येथे संपन्न झाला. तसेच या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण यूट्यूब द्वारे करण्यात आले. सर्व समाज बांधवांनी, नातेवाईकांनी व मित्र परिवारांनी यूट्यूब द्वारे या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच अनेक नातेवाईकांना व्हिडिओ संदेश द्वारे नवदांपत्यास शुभेच्छाही दिल्या. सदरील कार्यक्रम आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर बघू शकतात.

डॉ. चारूस्मिता (M. Pt. Orthopaedics ) असून डॉ. जतिन (DNB Orthopedic Surgeon) मुंबई येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये सेवा करीत आहे. आज या नवदाम्पत्य च्या लग्न सोहळ्यास विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पारंपारिक लग्न ही सात वचन केल्याशिवाय पूर्ण होत नाही. पती-पत्नी अग्नीभोवती सात फेऱ्या घालून सात जन्मांचं वचन घेतात. त्याने सात जन्मासाठी एकमेकांचे होतात, असे म्हटले जाते. आपल्या पारंपरिक पद्धतीला अनुसरून आज डॉ. चारूस्मिता व डॉ. जतिन आपलं सप्तपदी पूर्ण करून विवाहबंधनात साता जन्मा साठी अडकणार आहेत.

लग्न म्हणजे आयुष्यातील खास अविस्मरणीय क्षण

अशा या नवदांपत्यास बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळ व जळगांव जिल्हा विद्या प्रसारक मंडळ जळगांव तर्फे व मी सुरेश शिवराम महाले व परिवाराकडून सस्नेह हार्दिक शुभेच्छा कृपी आशीर्वाद…

डॉ. चारूस्मिता व डॉ. जतिन बडगुजर

1 Comment

  1. माननीय श्री सुरेश महाले भाऊसाहेब यांचा लेख वाचनीय आहे.खुप आवडला.
    बडगुजर वेब पोर्टल टिम चे अभिनंदन.
    अत्यंत नियमितपणे आपले समाजसेवेचे कार्य सुरू आहे. / डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर
    अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*