“पालघर येथील एस. टी. चालक श्री. गोपाळ रामकृष्ण कोतवाल यांची कोरोनावर यशस्वी मात” – श्री. विनोद मोहकर, पुणे

मी गोपाळकृष्ण कोतवाल राहणार कुर्हे पानाचे हल्ली मुक्काम पालघर येथे राहत असून मी पालघर एस. टी. आगारात चालक तथा वाहक पदी काम करीत आहे. तरी दिनांक 7.4.2021 रोजी पुणे स्वारगेट येथे ड्युटी घेऊन गेलो होतो. व 8.4.2021 रोजी स्वारगेट वरून परत येताना कशामध्ये थोडा त्रास होऊ लागला. जास्त त्रास होऊ लागल्यामुळे मी जसा घरी आलो तसा उपाय म्हणून गरम पाण्याने गुळण्या केल्या मग गरम पाणी पिलो. तसेच वाफ सुद्धा घेतली. परंतु दुसऱ्या दिवशी त्रास जास्त वाढू लागल्याने मी पालघर ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन कोरोना चाचणी करून घेतली व तेथील डॉक्टरांनी मला काही औषधे दिली. ती घेतली पण तो त्रास काही कमी होत नव्हता. तरी मी त्यावर उपाय म्हणून गरम पाणी पिणे, लिंबू पाणी, वाफ घेणे असे उपचार चालू होते. तो दिवस तसाच गेला 10.4.2021 रोजी हॉस्पिटल मधून डॉक्टरांचा फोन आला की आपण करून पॉझिटिव आहात आणि त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली.

घरात मिसेस दोन मुली फार घाबरले अशा परिस्थितीत तुम्ही मोठ्या हिमतीने त्यांना समजावून सांगितले व घरी गावी फोन केला. तेव्हा माझ्या मोठ्या भावाने मला आधार देऊन मार्गदर्शन करून मला खंबीर होण्यास सांगितले व आमच्या कुर्हे गावातीलच आमचे समाज प्रिय डॉ. उमेश बडगुजर यांना संपर्क करायला सांगितले. डॉक्टर उमेश बडगुजर यांनी मला काही औषधी व्हाट्सअप वर लिहून पाठवले व ती कशी द्यावी याचे योग्य ते मार्गदर्शन केले. व मला माझ्या घरामध्ये विलगीकरण होम क्वॉरनटाईन होण्यास सांगितले. तसेच डॉ. उमेश हे दररोज तब्येतीची चौकशी करत व योग्य ते मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या योग्य उपचाराने व माझ्या सकारात्मक विचारांमुळे मला चांगला फरक पडला. मी जवळजवळ ७५% बरा झालो. त्यानंतर डॉक्टरांनी मला काहीच रक्ताच्या चाचण्या करायला सांगितल्या व काही औषधे दिले. त्या रक्ताच्या चाचण्या चा रिपोर्ट मी डॉ. उमेश यांना पाठवले. त्यांनी मला सांगितले की आता सर्व काही ठीक आहे. त्या दिवसापासून माझ्या तब्येतीमध्ये चांगलीच सुधारणा झाली. दिनांक 24.4.2021 रोजी मी कोरोना मुक्त झालो. त्यात सर्वात मोठे योगदान हे डॉक्टर उमेश बडगुजर तसेच माझ्या मेसेज खंबीरपणा मुळे त्यामुळेच मी कोरोनावर मात करू शकलो.

श्री. गोपाळ कोतवाल यांना कोरोना काळामध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावलेली आहे. गतवर्षी त्यांना याकरिता कोरोना योद्धाचा सन्मानही पालघर आगाराकडून मिळालेला आहे.

ते एकटेच घराच्या बाहेर जात असत व आपले कर्तव्यासाठी विविध ठिकाणी ट्रिपला जावे लागत असे. त्यामुळे जास्त लोकांशी संपर्क येत होता. त्यामुळे संसर्ग होण्याचा चान्स जास्त होता. तरी योग्य ती खबरदारी घेत असल्यामुळे त्यांनी आपल्या परिवाराला याची झड लागू दिली नाही.

जसे त्यांनी कोरोनावर मात केली तशी आपण सर्व ही नक्कीच कोरोना वर मात करू शकतात. योग्य ती खबरदारी व काळजी घेणे हेच मोठे औषध कोरोनासाठी आहे. सर्वांनी काळजी घ्या, शासकीय नियमांचे पालन करा, मास्क वापरा, हात वेळोवेळी धुवा आणि आपली व आपल्या परिवाराला या आजारापासून सुरक्षित ठेवा. धन्यवाद.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*