सरस्वती मिशन आणि बडगुजर युवा संगठन सूरत च्या आवाहनास विक्रमी यश हॉस्पिटल बिल साठी १ लाख रु. ची भरीव मदत – श्री. दिनेश लोटन बडगुजर, सुरत

सुरत येथील समाज भगिनी श्रीमती. मनीषा जगदीश बडगुजर. यांना दि.- 12/04/2021 हया दिवशी जुळवे मुल जन्माला आले. पण जुळवे मुल हे साडेसहा महिन्यतच जन्माला आल्यामुळे त्यांची वाढ पूर्ण झाली नाही त्यामुळे दोन्ही मुलांना काचेच्या पेटीत ठेवलेले आहे. दोघांच्या काचेच्या पेटीचे दिवसाचे १४००० रुपये लागत आहे अंदाजे खर्च रु.२,३२,५०० लागणार आहे. या संदर्भात बडगुजर युवा संघटन चे सदस्य धर्मेश बडगुजर व लहान मुलांचे काका दिनेश बडगुजर यांनी ठाणे येथील सरस्वती मिशन प्रतिनिधी ज्ञानेश्वर बडगुजर यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली.

समाज बांधव अडचणीत असल्याची माहिती मिळाल्यावर सरस्वती मिशन तर्फे डॉ. श्री. उमेश बडगुजर, डोंबिवली यांनी मुलांचे काका श्री. दिनेश बडगुजर यांच्या बरोबर बोलून आजारपणाची सविस्तर माहिती घेवून, लवकरात लवकर मदत करण्याची गरज असल्याचे कळाले.

श्री ज्ञानेश्वर बडगुजर, ठाणे यांनी त्यांचे वर्ग मित्र श्री निलेश पाटील, अमेरिका यांच्या सोबत संपर्क साधला व लहान मुलांच्या बाबतीत माहिती दिली. निलेश पाटील भाऊ यांनी लागलीच लहान मुलांचे काका दिनेश बडगुजर यांच्यासोबत संपर्क साधून सविस्तर चर्चा केली व कुटुंबास धीर दिला. हॉस्पिटल मधील डॉक्टर यांच्या सोबत बोलणे करून लहान मुलांची सर्व माहिती घेतली व त्यानंतर हॉस्पिटल च्या अकाउंट ला १ लाख रु. ट्रान्स्फर केले. तसेच आपल्या समाजातील दानशूर व्यक्तींनी ही मदत केलेली आहे. त्या सर्वांचे येईल मी आमच्या कुटुंबाच्या वतीने आभार मानतो व सर्वांचे आम्ही सदैव ऋणी राहू.

डोंगरा एवढे बिल आम्ही कसे देणार या विचारानेच जीव कासावीस झालेल्या माझ्या कुटुंबास अडचणीच्या वेळेस मदत करून जीवात जीव आणणाऱ्या निलेश पाटील भाऊ व ज्ञानेश्वर बडगुजर भाऊ यांचे आयुष्यभर आमचे कुटुंब ऋणी राहील.

लहान मुलांचे काका – श्री. दिनेश लोटन बडगुजर, सुरत

1 Comment

  1. श्री निलेश पाटील भाऊसाहेब
    अमेरिका
    आपले अभिनंदन, शुभेच्छा.
    नमस्कार.
    -डाॅ दिलीप बडगुजर अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*