शहापूर येथील डॉ.रविंद्र बडगुजर (मूळगाव साकळी यावल) व डॉ.सरिता र.बडगुजर यांचा मुलगा श्री.मयूरेश बडगुजर हा डॉ.वैशंपायन सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून MBBS च्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण होऊन वैद्यकीय पदवीचा मानकरी ठारला.
चि. मयुरेश लहानपणा पासूनच चुणचुणीत आणि चाणाक्ष होता. इ.१० वी व १२ वीत ही त्याने दैदिप्यमान यश संपादन केले होते. आईवडीलांची प्रेरणा व मार्गदर्शना मुळेच मी यश संपादन केलेची स्पष्टोक्ती मयुरेशने व्यक्त केली.साकळी, व शहापूर परिसरात आनंदाचे वातावरण असून त्याचे यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून येथून पुढे मयुरेश कडून वैद्यकीय क्षेत्रांत भरघोस यशाच्या अपेक्षा होत आहेत.
अ .भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्रॉऊड ग्रुप तथा वेब पोर्टल टीमतर्फे मयुरेश व आईवडीलांचे अभिनंदन व शुभेच्छा.


Congratulations Dr Mayuresh.
अभिनंदन डॉ मयुर सर
आणि मातापित्यांचे!
शुभेच्छा!
/ डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर
अमरावती
वा उत्तम बातमी, अभिनंदन डॉक्टर मयुरेश अँड माता पित्याचे
Congratulations Mayur