बोदवडचा हर्षल (गटलू) कैलास बडगुजर कोरोना रूग्णाला दवाखान्यात पोहचविण्यासाठी स्वतः बनला चालक

बोदवड येथील काही युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वेच्छेने या कोरोना काळात लोकांची मदत करता यावी यासाठी कोरोना योद्धा टीम तयार केली आहे. या टिममार्फत कोरोना रुग्ण व त्याचे संबंधित रुग्णांना मदत केली जाते. याच टीम मध्ये बडगुजर समाजातील बोदवड येथील धडाकेबाज कार्यकर्ते हर्षल (गटलू) बडगुजर हे सदस्य आहेत.

बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात एक पेशंट सिरियस झाले त्यांना डॉक्टरांनी तत्काळ जळगावी हलवण्याचे सांगितले अशा परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक यांना ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका भेटत नव्हती. अशावेळी नातेवाइकांनी या कोरोना योद्धा टीमला सहकार्यासाठी फोन केला त्यांच्यामार्फत ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे कळाले, पण नेमका चालक उपलब्ध नव्हता. चालक उपलब्ध नाही ही माहिती समजताच टीममधील सक्रीय कार्यकर्ते हर्षल (गटलू) बडगुजर यांनी स्वतः चालक म्हणून जायची तयारी दर्शवली. क्षणाचाही विचार न करता हर्षल बडगुजर यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जळगांव येथे भरती केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हर्षल याने रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या साहसी कार्याबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. याकरता त्याला कोरोना योद्धा टिम मधील अकिल कोठारी, छाजेड, गोलू, बिट्टू इत्यादी सदस्यांचे सहकार्य सुद्धा लाभले.

हर्षल ने हे साहसी कार्य ज्यावेळेस केले. त्यावेळेस त्यावर एक विशेष जबाबदारी सुद्धा होती. त्यांच्या वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना अकोला येथून औषध आणण्यात आली होती. ही औषधे पोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती पण त्याने अस्वस्थ रूग्णाला प्रथम मदत केली. त्याच्या या कर्तृत्वाची चर्चा बोदवड तालुक्यातील जनतेत सर्वत्र सुरू आहे.

अशा या खऱ्या व धाडसी कोरोना योध्दास बडगुजर. इन टिमचा सलाम ??????

हर्षल (गटलू) बडगुजर, बोदवड

3 Comments

  1. श्री हर्षल बडगुजर भाऊसाहेब यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
    बडगुजर वेब पोर्टल टिम चे अभिनंदन./
    डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर अमरावती

  2. श्री हर्षल भाऊ यांचे कोरोणा काळातील मदतकार्य अभिनंदनीय ही वेळ आधार देण्याची आहे त्यांच्या माध्यमातून व कार्यकर्त्यांच्या मदतीने गरजवंताला आधार मिळतो धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*