दि.२२/०४/२१.क्रांती सूर्याचा अस्त
बडगुजर उत्कर्ष मंडळाच्या क्रांती सूर्याचा अस्त
समाजात अनेक व्यक्ती संपर्कात येतात पण काहींच्या आपल्या व्यक्तिमत्वाचा विचार संस्कारांचा सुस्वभावी आचरणांनी आठवणीत राहतात असे आमच्या बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष दर्शन परिवाराचे सक्रिय सल्लागार कै. श्री. आर. डी. नाना साहेब यांचे दि २२ एप्रिल २०२१ रोजी पहाटे ०३.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याचे समजले मन कसे सुन्न झाले, बातमी वर विश्वास बसत नव्हता कारण की, त्यांच्याशी पंधरा वीस दिवसांपूर्वी फोनवर आमचे दोघांमध्ये बऱ्याच वेळ पर्यंत बोलणे झाले होते. असे अचानक कसे काय होवू शकते. नंतर नंतर व्हाट्स अॅप सर्व गृप एकच हळहळ जाणवत होती.
त्यांचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण, शालेय शिक्षण, घेऊन नंदगाव – अमळनेर येेथे झाले. नंतर ते मुंबईत उपनगर डोंबिवली पूर्वेस पेंडसे नगर, मिलन छाया या बिल्डिंग मध्ये वास्तव्यास होते. इंडीयन ऑईल कंपनी मुंबई, मध्ये वाणिज्य प्रबंधक लेखाधिकारी होते. पानेवाडी (मनमाड) शिरुड ऑईल डेपो (धुळे) अशा ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अतिशय शिस्तप्रिय, तसेच इंग्रजी भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. मूळगांव नंदगाव, अमळनेर असल्याने त्यांचे निवृत्तीनंतर वास्तव्य अमळनेर येथे होते. बडगुजर समाजासाठी व ते नेहमी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाच्या विकासासाठी यशस्वी मार्गदर्शन करत असत. कल्याण पूर्व बडगुजर समाज वसतिगृह टिटवाळा येथील समाज वसतिगृह साठी त्यांचे योगदान स्मरणात राहील. ओबीसी संदर्भात त्यांचे विचार प्रेरणादायी होते. प्रशासकीय आर्थिक राजकीय वित्त विभाग क्षेत्राचा अभ्यास व अनुभव प्रचंड होता मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपली भूमिका निभावली. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत सुविचार प्रसारण ऑडियो क्लिप दररोज सकाळी सात वाजता स्वस्वरात प्रसारित करत एक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला. प्रयोगशीलता नवीन उपक्रम कार्यकर्त्यांशी सुसंवाद, त्यांना प्रोत्साहन, त्यांना प्रेरणा देत असत. त्यांचा जनसंपर्क अतुलनीय होता. समाजातील चालीरीती परंपरा याबाबत त्यांचे विचार उपक्रमशील होते. निटनेटके पणा, बिनचूक व्यवहार यात कार्यकुशल होते. आज कै. नानासाहेब आपल्यातून निघून गेल्याने (अनंतात विलीन झाल्याने) समाजाने निष्ठावंत कार्यकर्ता हरवल्याचे जाणवते असून समाज पोरका झाला आहे. तसेच
त्यांच्या निधनाने मोठी क्षती निर्माण झाली आहे युवा पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन करीत नातेवाईक समाज बांधव मित्रमंडळी यांचेशी सलोख्याचे संबंध होते. अशा निष्ठावंत समाज मार्गदर्शकास समाज मुकला आहे परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना कै. नानासाहेब यांना आमच्या परिवाराकडून मन:पूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली
शोकाकुल स्नेही :-
श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर (सी पी सर )
ऐरोली नवी मुंबई


Leave a Reply