Positive news
डॉ.शामकांत बडगुजर यांची कोरोनावर मात
दि. 27 मार्च रोजी अचानक भरभरुन ताप आला, आई म्हणाली ऊन लागले असेल. काही केल्या ताप कमी होईना. दुसर्या दिवशी रविवार (दि. 28 मार्च), असल्या कारणाने खाजगी लॅब वाले कुणीही तयार नव्हते, तसेच सोमवारी धुलिवंदन ची सार्वजनिक सुट्टी होती. म्हणून टेस्ट केली तर अहवालासाठी 3 दिवस वाट बघावी लागणार होती. शेवटी जवळच असलेल्या NMMC च्या सरकारी दवाखान्यात गेलो. तिथे Antigen Test केली आणि Positive आली. त्याचवेळी पायाखालची जमीन हादरली कारण घरी 59 वय असलेली आई आणि 11 महिन्यांची माझी मुलगी आणि पत्नी आहे, या सगळ्याचा विचार मनात आला (पण दैवी शक्ती मुळे आजपर्यंत सर्व जण सुखरूप आहेत). याचे कारण म्हणजे मी व माझे कुटुंब शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले, वेळोवेळी हाथ धुणे, सेनिटाईज करणे, मास्क वापरणे इ. यामुळे हा प्रभाव माझ्या पासून माझ्या घरच्यापर्यंत पोहचला नाही. त्याबद्दल मी परमेश्वराचा सदैव ऋणी राहील.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर दवाखान्यातील डाॅक्टरांनी घरी पण जाऊ दिले नाही आणि लगेचच Quarantine centre ला अॅडमीट केले. तेथे गेल्यावर माझा थोडा त्रास वाटू लागला. सतत येणाऱ्या खोकल्या मुळे छाती दुखू लागली होती, अशक्तपणा वाढला होता, जेवण जात नव्हते. मग अशावेळी मी कंपनीतल्या मालकांच्या मदतीने मुंबई येथील St. George Hospital ला अॅडमीट केले. मोठ्या हॉस्पिटलमध्ये अडमिट केल्यानंतर उपचार सुरू झाले. आजूबाजूला पेंशट भरपूर होते. पण सकारात्मक विचार आणि नातेवाईक मित्रपरिवाराने दिलेले धैर्य व डॉक्टरांच्या उपचार पध्दतीने मी लवकर बरा झालो. सलग दहा दिवस उपचार घेऊन 16 एप्रिल रोजी मला हाॅस्पीटल मधुन सुट्टी मिळाली.
हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असतांना आपल्या सोबत कोणी नातेवाईक आप्तेष्ट मित्र कोणी नसतात त्यावेळी आपला एकच सोबती असतो तो म्हणजे मोबाईल. या मोबाईलचा वापर मी फक्त माझ्या घरच्यांशी बोलण्यासाठी व थोडावेळ ई-बुक वाचणे, ऐतिहासिक आर्टिकल वाचणे इ. बघण्यासाठी केला. या काळातील मी पुर्णपणे सोशल मीडियापासून लांब राहिलो. याचा मला भरपूर फायदा झाला. मन प्रसन्न राहत होते.
माझ्या आजूबाजूला सुद्धा पेशंट होते. ते सोशल मीडियाचा वापर करत असत आणि त्यावर येणाऱ्या संदेश व बातम्या या त्यांचा धिर खचवत होत्या. कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल डाउन होत होती. मी त्यांना यापासून लांब रहा असा सल्ला दिला.
परमेश्वर कृपेने, आधी क्वारंनटाइन सेंटर आणि नंतर सेंट जाॅर्ज हाॅस्पीटल, मुंबई येथील प्रदिर्घ अशा 20 दिवसाच्या कालखंडानंतर हाॅस्पीटल मधुन सुखरूप घरी पोहोचलो. आज रोजी Home Isolation चा एक आठवडा सुखरूप पुर्ण होत आहे. इच्छाशक्ती व सकारात्मक विचार हे आपल्या शरीरात कोरोनाला भिनू देत नाही. त्यामुळे जिद्द आणि धैर्य बाळगा, योग्य वेळी उपचार घेतल्यास आपल्या शरीरात कोरोना जास्त काळ टिकू शकत नाही.
थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपल्या सारख्या मोठ्या व्यक्तींचे तसेच आई वडीलांच्या आशीर्वादाने मी आज कोरोना पासुन मुक्त झालो.
रिपोर्ट जरी positve आला तरी थिंकिंग positve असणे गरजेचे आहे, असा संदेश


Leave a Reply