मना मनात मानवा तू शोधून पहावे – श्री चंद्रकांत पितांबर बडगुजर ऐरोली नवी मुंबई

मना मनात मानवा तू शोधून पहावे या पृथ्वी भूतलावरील नैसर्गिक किती तरी अनमोल साठा म्हणजेच (प्राणवायू-आॅक्सिजन) असताना मानवास आज पर्यंत त्याची कधीही जाणीव झाली नाही.
आपण जगलेल आयुष्य सुंदर होतं हे आपणा सर्वांना जाणवतं निसर्गातील हवा पाणी पशू पक्षी वनस्पती उंच डोंगर रांगा जलाशय सरोवर नद्या नाले सागर सूक्ष्म काय महाकाय वनस्पती प्राणी आणि असे अनेक घटक जे आपणांस परम पिता परमेश्वर प्रदान करतो जीवसृष्टी निर्माण करतो.
आज सर्वानाच वाटत हे कोरोनाच संकट लवकर जाऊ दे सर्वांवर कृपा कर आज जाणीव होते आज पर्यंत प्राणवायू च मोल काय आहे हे आज आपणांस जाणवतं परमेश्वराने सृष्टी निर्माण करत असताना चांगले व वाईट देव आणि दानव यांचं संतुलन करून ठेवलं आहे.
शेवटी आपल्या हातात काहीच नाही आपल्या प्रत्येक श्वासावर परमेश्वराचाच अधिकार आहे आपल्या प्रत्येक कृतीतून नामस्मरण असावं निसर्गानं कोरोनाच्या माध्यमातून लावलेला ब्रेक आहे वेगाने धावणार जग थांबवलं वेग कमी केला अनितीच्या गोष्टी राग लोभ अहंकार सूडबुद्धी गर्विष्ठ पणा आकरस्ताळेपणा या जाणवायला लागल्या आता प्रत्येक माणूस एकमेकांची जीव वाचिवण्या
साठी इच्छा असेल तरी मदत करू शकत नाही नातेवाईक यांना भेटता येत नाही धनसंपत्ती असून जीव वाचवता येत नाही हे सर्व चक्र थांबवलं आहे.

तरी सर्वांनी आहे त्या परिस्थितीत मार्ग काढणे आवश्यक आहे आता जीवनात अस्तित्व यालाच प्राथमिकता आहे बाकी सर्व शून्य असो देवावर विश्वास ठेवा समाधानी राहण्याचा प्रयत्न करीन असा संकल्प करू या जगात सर्व सुखी आहे पण समाधानी नाही ते मानण्यावर आहे.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।।
अर्थ : सर्वांनी आनंदी राहावे, सर्वजण आजारांपासून मुक्त होवोत, सर्व शुभ घटनांचे साक्षीदार होवोत आणि कोणालाही दु:खाचा सामना करावा लागू नये.” ही परमेश्वराकडे प्रार्थना!
असो मनात जाणवलं म्हणून संवाद साधला
सुरक्षित रहा! स्वस्थ रहा!! धन्यवाद?
श्री चंद्रकांत पितांबर बडगुजर (सी पी ) ऐरोली नवी मुंबई 9833132881

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*