मैत्रीच्या दुनियेतील राजा हरपला – श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर उपाध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती

मैत्रीच्या दुनियेतील राजा हरपला …………

शोक संदेश ….
एरंडोल,पिंपळकोठा येथील: ह.भ.प.श्री.
गोपीचंद (नाना) हरचंद बडगुजर, अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ पिंपळकोठा, सौ. चापाबाई गोपीचंद बडगुजर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपळकोठा यांचे सुपुत्र, चि.
वैभव प्रविण बडगुजर यांचे वडील आणि अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती उपाध्यक्ष श्री.धर्मेंद्र पोपटराव बडगुजर यांचे मोठे जावाई, स्व. बापुसो प्रविण गोपीचंद बडगुजर यांना १७/३/२०२१ रोजी देवाज्ञा झाली,बातमी ऐकून धक्काच बसला सर्वानाच वाईट वाटले.
“माणुस किती जगला त्यापेक्षा कसा जगला आहे प्रेत यात्रेवरून त्यांची किंमत जनता पाहे” सरांच्या प्रेतयात्रेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावरून त्यांची लोकप्रियता कळते. प्रविण या नांवाप्रमाणेच ते सर्व बाबतीत प्रविण ठरले घरातूनच वडिलांचा धार्मिक वारसा मिळाल्यामुळे पोथी, पुराण, किर्तन प्रवचन हे संस्कार बालपणापासून झालेत. कुठल्याही कार्यात ते तन, मन, धनाने सहभागी होऊन मदतीचा हात देत असत.
मनापासून “समाज सेवेची आवादभारी”।
सदोदित मुखी नाम रामकृष्ण हरी ।।
या प्रमाणे नेहमी हसतमुखत राहुन सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपळकोठा येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असतांना ते समाज सेवेतही क्रियाशील होते.
हाती घ्यावे सत्कर्म तडीस न्यावे हा धर्म अशाप्रकारे स्व. बापुसो प्रविण रघुवंशी सरांनी बडगुजर शिक्षण प्रसारक मंडळ जळगांव सचिव, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ एरंडोल व औदुंबर साहित्य मंच या ठिकाणी बापुना संधी मिळाली ते अभ्यासु रसिक व साहित्यिक होते.
धर्मपत्नी म्हणून सौ.मनीषा ताई त्यांचा जीवनात आल्या सुख दुःखात साथ देऊन एकत्र कुटुब सांभाळून ठेवले. घरादाराची प्रगती केली. आपला परका भेदभाव केला नाही पती हेच परमेश्वर मानून त्यांची रात्रदिवस सेवा केली दोघांच्या हाती आदरातिथ्य व परोपकार होता. ज्याची बाई चांगली त्यांचा संसार चांगला हे ताईनी खरे करून दाखवले सर्व मुलामुलींना चांगले शिक्षण व संस्कार केले चि. वैभव हा M Tech food Tectoalogy होऊन बेळगांव येथे quality officer म्हणून कार्यरत आहे त्यांचे लग्नाबाबत बेत व इतर अनेक स्वप्ने रंगविली पण नियतीच्या मनात वेगळेच होते अर्ध्यावर डाव सोडून ते निघून गेले.
स्व. बापुसो. प्रविण गोपीचंद रघुवंशी सर हे सर्वांचे लाडके व विद्यार्थी प्रिय शिक्षक होते ते मातृ पितृ भक्त पुत्र, प्रेमळबंधु , प्रेमळ पती, कुटुंबवत्सल ह्या सर्व भूमिका त्यांनी शेवटच्या श्वासापर्यत सर्वस्वी निभावल्या गावगाडा, मित्र परिवार शेती माती याशिवाय महत्वाचे म्हणजे घरातील माय ब गोठ्यातील गाय ह्यावर त्यांचे नितांत प्रेम होते.

 " मरावे परी किर्ती रुपी उरावे या म्हणी प्रमाणे स्व.बापूचे आचरण व व्यवहार होता. 
 आई वडील हयात असतांना तरुण मुलाचे जग सोडून जाण्याचे दु:ख असते. तसेच आई, वडील, सासू सासरे हयात असताना मुलीने विधवा होणे हे खूप क्लेशदायक आहे. असो नियतीपुढे कुणाचे चालत नाही.
 त्यांच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी जावई, नातु, भाऊ,भावजाई, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे असा मोठा गोतावडा आहे परंतु सैरभैर नजर त्यांनाच शोधत असते आठवणींनी न कळते पापण्या ओलावतात व आठवणींचे काहूर माजते पुष्पहाराचे पलीकडील फोटोमधील चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडस होत नाही . त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तींना ते आभाळा एवढे उत्तुग वाटतात व आभाळास शब्दात बांधणे तेवढेच कठीण
अस हे सर्वाचं हवेहवेसे वाटणारे मितभाषी,  शांत, नम्र, निगर्वी व प्रेमळ अष्टपैलू व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे रघुवंशी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवोव प्रभू त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो न. 
 रघुवंशी परिवाराच्या दु:खात ग्रामपंचायत पिंपळकोठा बडगुजर, बडगुजर समाज, उत्कर्ष मंडळ एंरडोल, श्री.निंबा पुना बडगुजर एंरडोल, सहकारी पतपेढी एंरडोल, विरदेलकर मित्रमंडळ नाशिक, तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती, शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळ, शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळ, शिरपूर शहर बडगुजर महिला मंडळ , श्री. चामुंडा माता प्रतिष्ठान शिरपूर क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ वाडी,  सातपुडा परिसर, बडगुजर समाज मंडळ बोराडी, सातपुडा परिसर बडगुजर समाज महिला मंडळ सहभागी आहेत. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*