????????
कै.नथ्थू आण्णा यांच्या संकल्पाची पूर्ती करून त्याला सिद्धीस नेणे व त्यातून समाजाची उन्नती घडविणे या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करत कै.नथ्थू आण्णा आमच्यासाठी एक प्रेरणेचे स्रोत होते असे उदगार विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.तुषार रंधे यांनी कै.नथ्थू आण्णा यांच्या जयंतीनिमित्ताने व लोकनेते कै.नथ्थू नामदेव बडगुजर सामाजिक प्रतिष्ठान च्या उदघाटन प्रसंगी केले.
दिनांक 20 फेब्रुवारी 2021 रोजी कै.नथ्थू आण्णा यांच्या जयंतीनिमित्त राजश्री शाहू महाराज हॉल बोराडी या ठिकाणी लोकनेते कै.नथ्थू नामदेव बडगुजर सामाजिक प्रतिष्ठानचे उदघाटन जि.प.धूळेचे अध्यक्ष श्री. तुषार रंंधे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस सातपुडा बडगुजर समाज मंडळ बोराडी मार्फत तुषार रंंधे यांचा जाहीर सत्कार ही करण्यात आला. प्रतिष्ठानच्या उदघाटनानंतर प्राथमिक स्वरूपात आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीदेवी पतसंस्थेचे चेअरमन आप्पासाहेब श्री.साहेबराव पितांबर पाटील होते.

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्री.माधवराव जानकीराम बडगुजर, श्री.विकास पुंडलीक बडगुजर जळगाव, श्री.सुरेश शिवराम महाले भुसावल, श्रीमती सुशीलाताई नथ्थू बडगुजर, श्री शिवाजी भटा पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष श्री राहुल रंधे, श्री दिलीप राघो बडगुजर नंदूरबार, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सचिव श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठानला भरिव मदत डॉ. तुषारभाऊ रंधे,
श्री.माधवराव जानकीराम बडगुजर, वर्षी श्री गुलाब राजाराम बडगुजर जापोरेकर, श्री. विकास पुंडलिक बडगुजर, जळगाव
श्री. पी. डी. बडगुजर सर जळगाव, श्री गोकुळ कुंभार बोराडी, श्री. व्ही डी बडगुजर. शिरपूर, श्री.विजयशेठ बडोदा, श्री. प्रभाकरशेठ नेवाळ. चिमठाणे आदी मान्यवरांनी देणगी देऊ केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजक श्री ज्ञानेश्वर नथ्थू बडगुजर, मुख्याध्यापक श्री टी.टी.बडगुजर सर , प्राचार्य श्री. ईश्वर हरचंद बडगुजर, श्री.पी.डी.बडगुजर सर, श्री.भगवान शंकर बडगुजर,श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, श्री चंद्रकांत बडगुजर सर, श्री.रविंद्र शिंदे, श्री संजय नथ्थू बडगुजर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम हा शासनाच्या सर्व नियमांच्या व अटींचे पालन करून आयोजित करण्यात आला त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष श्री तुषार रंंधे यांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत बडगुजर सर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री ईश्वर बडगुजर सर यांनी केले तसेच कार्यक्रमास उपस्थितांचे आभार बडगुजर महासमितीचे सचिव श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांनी मानले.


Leave a Reply