नंदुरबार शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील नंदवाळकर यांचा “कोविडयोद्धा” म्हणून सन्मान तसेच कार्यास सलाम – डॉ. निखिल बडगुजर, धुळे

७२ व्या प्रजासत्ताक दिवसाचे औचित्य साधून पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री के.सी. पाडवी तसेच नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री डॉ. राजेंद्र भारूड तसेच अन्य प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड काळात अतिशय उत्तमरित्या सेवा देणारे तसेच कोरोना या रोगावर यशस्वीरीत्या मात करून आपल्या सेवेवर लवकरात लवकर रुजू होऊन अंतर्गत देश सेवेत आपले मोलाचे योगदान देणारे व अखंडित देशसेवेचे व्रत घेतलेले नंदुरबार शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनील दिगंबरशेठ नंदवाळकर यांचा दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी ध्वजारोहणाच्या शुभमुहूर्तावर पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री के.सी. पाडवी यांच्या शुभहस्ते कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप , जय बडगुजर सेना यांच्यामार्फत हार्दिक अभिनंदन व त्यांच्या कार्यास सलाम……

नंदुरबार शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनील दिगंबरशेठ नंदवाळकर सन्मानपत्र स्विकारतांना

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*