? स्नेह – संमेलन?
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चाळीसगांव बडगुजर समाज मंडळाचा ३ रा वर्धापण दिन दिनांक २२/०१/२०२१ रोजी मेहूणबारे ता. चाळीसगांव येथे श्री. शांताराम बडगुजर यांचे कडे उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे
?वार्षिक बाक्षिस समारंभ
?सामुदायिक हळदीकूंकू
?सांस्कृतीक कार्यक्रम
? सैनिकांचा सत्कार ही करण्यात आला या कार्यक्रमात अनेक सामाजिक, सांस्कृतीक विषयी चर्चा करण्यात आली, विशेष म्हणजे या कार्यक्रर्मात बाल गोपाल, नवोदय युवतीनी व सर्व बडगुजर समाज मंडळाने आपला खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व या कार्यक्रमात जे विजयी झाले त्यांना प्रोत्साहन पर बाक्षिस देण्यात आले व विजेत्यांनी त्या बक्षीसांची रक्कम ही जमा करून तो निधी हा चाळीसगांव बडगुजर समाज मंडळाच्या विकास कामासाठी सपूर्त केला व एक आदर्श, दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले.
? चाळीसगांव बडगुजर मंडळाची नवीन कार्यकारणीही स्थापन करण्यात आली. त्या कार्यकारणीतील सदस्यची नावे पुढील प्रमाणे
▪️श्री. शशिकांत वामन शेठ बडगुजर – अध्यक्ष
▪️श्री. रमेश श्रीकृष्ण शेठ बडगुजर – उपाध्यक्ष
▪️श्री. संदीप चंद्रकांत शेठ बडगुजर- सचिव
?कार्यक्रमाचे सुत्रसंचलन
सौ. संयोगिता बडगुजर यांनी केले
?कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्रा.श्री. बी.जी. बडगुजर सरांनी केले
?प्रा.श्री. निळकंठ बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केले
अशा प्रकारे सर्व कार्यक्रम खेळी मेळीच्या वातावरणात आनंदाने व सहभोजनाने कार्यक्रम पार पडला ? सर्व चाळीसगांव बडगुजर समाज बांधव व भगिनी यांचे आभार ?







Leave a Reply