ठाणे : प्रतिनिधी, कोरोना या महामारीमुळे घाबरून न जाता बडगुजर समाज बांधवाचा रविवारी २४ जानेवारी रोजी ठाणे येथील आर. जे. ठाकूर विद्यालयात जागतिक स्तरावर ऑनलाईन वधू-वर मेळावा झाला. या मेळाव्याला जगभरातील हजारो समाज बांधवानी लाभ घेतला. आमदार संजय केळकर यांनी दिपप्रज्ज्वलन करून या मेळाव्याचे उदघाटन केले. तसेच ऑनलाईन मेळाव्याचे डिजिटली प्रक्षेपण केले. काही क्षणातच हजारो जण या मेळाव्यास उपस्थित असल्याचे आमदार केळकर यांनी पहिले, बडगुजर समाजाचा हा मेळावा अन्य समाजासाठी दिशादर्शक ठरेल, यामुळे तरुण पिढीला लाभ होणार असून अन्य समाजासाठी हा उपक्रम आदर्शवत असल्याचे मत आमदार केळकर यांनी व्यक्त केले. जगभरातुन १० हजारपेक्षा अधिक जणांनी हा मेळावा थेट पहिला. यात सुमारे दोनशे वधू-वरांनी ऑनलाईन परिचय करून दिला.

या मेळाव्याला अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष माधवराव बडगुजर, सचिव, राजेंद्र बडगुजर, यांच्यासह , प्रकाश रघुनाथ, श्री. महाले आदी प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खगोलशास्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी मेळाव्याचे महत्व अधोरेखित केले. आयोजक उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बडगुजर यांनी मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाजाचे आभार मानले. तत्पूर्वी आयोजन प्रमुख मदन बडगुजर यांनी मेळाव्याचे वेगळेपण सांगितले. उत्कर्ष मंडळ आणि सहयोगी संस्थांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
बडगुजर समाज देश विदेशात पसरला असून महाराष्टासह गुजरात आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक वास्तव्य आहे. तसेच दुबई, अबुधाबी, मस्कत या आखाती देशांसह अमेरिका, जर्मनी, डेन्मार्क, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात समाजाचे युवक आणि युवती मोठ्या संख्येने नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. सद्य स्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने समाजातील युवकांनी हा उपक्रम हाती घेतला होता त्यास उदंड प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
ऑनलाईन वधू-वर मेळावे आजवर अनेक झाले परंतु जागतिक स्तरावर अशा प्रकारे होणारा हा पहिलाच मेळावा ठरला.
या मेळाव्यासाठी दिपक बडगुजर, अविनाश बडगुजर, लोकेश कोतवाल, रमाकांत बडगुजर, ज्ञानेश्वर बडगुजर, अमित बडगुजर आणि प्रकाश बडगुजर या युवकांचे तसेच देशभरातील समाज संघटनांचे मोठे योगदान लाभले आहे. समाजतील जेष्ठ बांधव रमेश बडगुजर, भगवान बडगुजर , सतीश बडगुजर, मोहन बडगुजर, चंद्रकांत बडगुजर, डॉ. उमेश बडगुजर, दिलीप बडगुजर तसेच मंडळाच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या सौ. नंंदीनी बडगुजर आदींचा हातभार लाभला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक उमेश बडगुजर यांनी केले तर आभार मंडळाचे सचिव रमाकांत बडगुजर यांनी मानले.


Nice program
क्षत्रिय बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबईचे अध्यक्ष पदाधिकारी व जागतिक ऑनलाईन डिजिटल वधू वर मेळाव्यासाठी ज्यांनी परीश्रम घेतले त्या सर्व कॉम्पुटर क्षेत्रातील समाजबांधव तसेच आयोजकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! खुप छान ! Congratulations