श्री अशोक भिवंसन बडगुजर हे बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा गावातून वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक लढवली होती. तसेच त्यांना आजपर्यंत केलेल्या समाजकार्याच्या बळावर ते 114 मतांनी निवडून आलेत, तरी त्या वॉर्डात भिल्ल व तडवी समाजाचे 200 मते, बडगुजर समाजाचे 20 मते, पाटील समाजाचे 300 मते, बेलदार समाजाचे 50 मते, मातंग समाज 20, मुस्लिम 100 व इतर असे एकूण 900 मते असलेले वॉर्डातून दणदणीत विजय झाला..
वॉर्ड क्रमांक ३ मध्ये आज पर्यंत शिवसेना पुरस्कृत पॅनल ने एकही जागा जिंकलेली नव्हती परंतु अशोक शेठ यांनी समाजकार्याच्या जोरावर तब्बल 3 जागा निवडून आणलेत..
तरी त्यांचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या कडून सत्कार झाला व त्यांनी ४० वर्षाच्या इतिहासाला तिलांजली देऊन दणदणीत ३ उमेदवार निवडून आणलेत. याबद्दल त्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती , बडगुजर प्राउड ग्रुप , बडगुजर डॉट इन टीम यांच्याकडून हार्दिक अभिनंदन.


Leave a Reply