♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती मार्फत नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्यांचा जाहीर सत्कार…
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
2021 या नवीन वर्षात पदार्पण केल्यानंतर लगेचच ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात उतरून आपल्या बडगुजर समाजाचा झेंडा जल्लोषात फडकविणारे आपले समाजबांधव ज्यांनी आपल्या बडगुजर समाज वास्तव्य असलेल्या विविध गावांमधून ग्रामपंचायत निवडणूकीत दणदणीत असा विजय मिळवला. त्या सर्व समाज बांधवांचे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती मार्फत जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या अतिशय चुरशीच्या तसेच रोचक होत्या. ज्या ठिकाणी आपल्या बडगुजर समाज बांधवांची संख्या अत्यल्प आहे अशा ठिकाणीदेखील आपल्या समाजातील समाज बांधव निवडून येणे हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. स्त्रियांना चूल आणि मूल एवढ्याच चौकटीत रहावे लागते. ही प्रथा मोडीत काढत आपल्या समाजातील स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किती सक्षम आहोत याचे उत्तम उदाहरण या ग्रामपंचायत पार्श्व निवडणुकीतून प्रस्तुत केले आहे. आज विविध गावांमध्ये या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून विजयी उमेदवारांनी आपल्या बडगुजर समाजाची मान गौरवाने उंचावली असून अशा सर्व निवडुण आलेल्या विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती मार्फत दि. 23/01/2021 वार शनिवार रोजी ,दुपारी ठिक 2:00 वाजता बालाजी विद्या प्रसारक मंडळ पारोळा याठिकाणी जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. आपण सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे अशी नम्र विनंती.
????????
आपले नम्र
सर्व पदाधिकारी , सदस्य व सर्व समिती प्रमुख
अखिल भारतीय बडगुजर समाज महासामिती .
????????

Leave a Reply