बडगुजर समाजाचा जागतिक ऑनलाईन वधू-वर मेळाव्याचे दि. २४ जानेवारी रोजी आयोजन – श्री. प्रकाश बबन बडगुजर, मुंबई

कोरोना या महामारीमुळे घाबरून न जाता बडगुजर समाज बांधवानी येत्या रविवारी २४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जागतिक स्तरावर ऑनलाईन वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात देशभरातील समाजातील इच्छुक वधू-वर तसेच परदेशात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मेळावा यू ट्यूब आणि face book लाईव्ह च्या माध्यमातून पाहता येणार असून इच्छुकांना वधू-वरची निवड करणे अधिक सुलभ होणार असल्याची माहिती बडगुजर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बडगुजर यांनी दिली आहे.
बडगुजर समाज देश विदेशात पसरला असून महाराष्टासह गुजरात आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक वास्तव्य आहे. तसेच दुबई, अबुधाबी, मस्कत या आखाती देशांसह अमेरिका, जर्मनी, डेन्मार्क, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात समाजाचे युवक आणि युवती मोठ्या संख्येने नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. सद्य स्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने समाजातील युवकांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

कोरोना संकटामुळे ऑनलाईन वधू-वर मेळावा घेण्यात येत असून त्यासाठी इच्छुकांना व्हिडिओ बायोडाटा पाठवण्याचे आवाहन केले होते, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. ते बायोडेटा संकलित करून त्याचे प्रक्षेपण ठाणे येथील आर. जे. ठाकूर कॉलेज येथून रविवारी २४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. या समारंभाला १० हजार पेक्षा जास्त समाज बांधव भेट देतील असा विश्वास आयोजन प्रमुख मदन बडगुजर यांनी व्यक्त केला आहे.


ऑनलाईन वधू-वर मेळावे आजवर अनेक झाले परंतु जागतिक स्तरावर अशा प्रकारे होणारा हा पहिलाच मेळावा असून त्याची नोंद गिनीज किंवा लिमका बुक मध्ये होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या मेळाव्यासाठी दिपक, अविनाश, दिलीप, लोकेश, रमाकांत, ज्ञानेश्वर, अमित आणि प्रकाश बडगुजर या युवकांचे तसेच देशभरातील समाज संघटनांचे मोठे योगदान लाभले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*