मा. श्री रंगराव नथ्थू बडगुजर रा. सामनेर यांच्या वाढदिवसानिमित्त – श्री. संजय जगन्नाथ बडगुजर, जळगांव

II जय चामुंडा माता II

मा. श्री रंगराव नथ्थू बडगुजर रा. सामनेर यांच्या वाढदिवसानिमित्त

ii मनसोक्त आनंद लुटण्यासाठी मा. श्री रंगराव नानांना ६७ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ii
खाजगी सेवेतून निवृत्त झालेल्या नानांची निवृत्ती म्हणजे कर्तृत्वाच्या विन मधून मुक्तता नव्हे. त्यांची निवृत्ती म्हणजे त्यांच्या नव्या अध्यायाची नवी आवृत्ती होय, या नव्या अध्यायाची नवी आवृत्तीचे मनसोक्त आनंद लुटण्याचे बळ मिळावे. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने शुभेच्छा देणेसाठी आज रोजी सर्व आप्तीष्ट व हितचिंतक कृतज्ञ सोहळ्यास उपस्थित आहेत.

श्री. रंगराव नानांंशी ज्यांचे सूर जुळून आले ते आयुष्याच्या उत्तरर्धातही टिकून आहेत. नाना एखाद्या गावातील समाज बांधवाना नावानिशी ओळखू शकणार नाही असे गाव व समाज बांधव शोधून सापडणार नाही. दूरचे जवळचे अशा सर्वच नातेवाईकांशी त्यांचा स्नेह त्यांनी कायम टिकून ठेवला आहे. त्या नातेसंबंधात गरीब श्रीमंत भेद त्यांनी कधी पाळलाच नाही.

“हात हे उगारण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी असतात” हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. यामुळे आर्थिक हीत जोपासंण्यापेक्षा स्वत पदरमोड करून अनेकांचे कौटुंबिक वाद नानांनी सोडविलेले आहेत. अनेक कुटुंब आता सुखाने संसार करीत असल्याचे समाधान नाना नेहमीच व्यक्त करीत असतात.
एकत्र येणे सुरुवात असते I
सोबत राहणे ही प्रगती असते II
एकत्र काम करणे हे यश असते III

या विचारणे समाज कार्याचा वसा आणि वारसा जपण्याची नानांनी नेहमीच बांधिलकी जपली आहे. नानांना आयुष्यात मित्र, समाज बांधव यांचे कडून भरभरून प्रेम मिळाले आहे. त्याग ही प्रेमाची कसोटी असते, त्याला ते ही अपवाद नव्हतेच.
शेवटी एकाच म्हणावेसे वाटते
तुम्ही श्रद्धेच्या ज्योती I
तुम्ही धैरेच्या मूर्ती II
कर्तृत्व सेवा तुमची III
कृतज्ञता आमची IIII

शब्दांकन- मा. श्री रंगराव नानांवर मनापासून प्रेम करणारे समाज बांधव

श्री. रंगराव नथ्थु बडगुजर (सामनेरकर)

2 Comments

Leave a Reply to सौ।स्वाती दिलीप बडगुजर अमरावती Cancel reply

Your email address will not be published.


*