अमरावतीच्या सौ. स्वाती दिलीप बडगुजर यांची उद्योग जगतात गरुड झेप ! – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार

गेल्या नऊ महिन्यांपासून व्यवसाय उद्योग क्षेत्रात जी शिथिलता आली होती ती घालवण्यासाठी अमरावतीच्या स्वाती बडगुजर यांनी महिला वर्गासाठी व त्यांच्या बचत गटांसाठी उद्योजिका प्रदर्शनी व विक्री लावली होती. सदर प्रदर्शनी मध्ये महिला वर्गाने आपले दागिने, साड्या,किचन अप्लायन्सेस ,हलव्याचे दागिने, विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. सदर प्रदर्शनी मधून महिलांच्या वस्तूंची भरभरून विक्री झाली व व्यवसायात आलेली शिथिलता दूर होण्यास मदत झाली. सदर प्रदर्शनाचे आयोजन स्थानिक सुयोग मंगल कार्यालय, रुक्मिणी नगर येथे दिनांक 8,9 व 10 जानेवारीस करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके तर दुसऱ्या सत्राची उद्घाटन महापौर चेतन गावंडे व पूर्ण महानगर पालिकेच्या टीम करवी करण्यात आले. सदर प्रदर्शनीमध्ये तीनही दिवस महिलांसाठी भरभरून कार्यक्रमाची रेलचेल ठेवण्यात आली होती. यात महिला वर्गासाठी स्मार्ट होम मिनिस्टर स्पर्धा, विचारा तुम्ही-सांगतो आम्ही, यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना काळात स्वतः रोजगार निर्मिती करून इतरांना रोजगार देणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले, पती-पत्नीने मिळून सामाजिक कार्य सोबत करणाऱ्या काही जोडप्यांचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या युवक-युवतींचे सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आले. स्वाती बडगुजर यांचे माहेर धुळ्याचे असून सासर शिरसाडचे आहे. त्यांचे पती डॉ. दिलीप बडगुजर हे अमरावती ग्रामिण भागात (जि.प.) गेली 34 वर्षे आरोग्य सेवा सेवा देत असून ते उत्तम कवी व वक्ता आहेत. त्यांची दोन्ही मुले ही उच्च विभुषीत असून लहान मुलगा आयआयटी कानपूर येथे M.S.करीत आहे तर मोठा मुलगा शुभम हा ‘Indian school of Development management’ दिल्ली येथे प्रशिक्षण घेत आहे. स्वाती ताईंनी आपल्या व्यवसायाची सुरुवात Beauty clinic टाकून,क्लासेस घेऊन सुरू केली. त्यानंतर ब्युटी मॅक्स ब्युटी इंन्स्टिट्युट मध्ये एच ओ डी , त्यानंतर पीएनजी मध्ये सीसीओ, त्यानंतर लोकमत सखीमंच मध्ये जिल्हा संयोजीका, त्यानंतर मातृमंडल नारीमंच मध्ये मुख्य संयोजीका, त्यानंतर स्वतःचा व्यवसाय टूर्स ट्रॅव्हल्स आणि महिला जगतासाठी उद्योग मिळावेत असा प्रवास करीत स्वातीताई आज इथंपर्यंत पोहोचल्या आहेत,समाजातील महिलांनी स्वतःचा उद्योग उभा करावा उद्योग मागणारे नाही तर उद्योग देणारे बना या आशयाचा संदेश त्या पूर्ण महिलावर्गात देऊ इच्छितात .स्वाती बडगुजर यांना आपणही कॉल करून आपल्या उद्योगाविषयी त्यांच्याशी बोलू शकता.
(स्वाती बडगुजर:
9665498170
9370815887)

1 Comment

  1. बडगुजर वेबपोर्टलचे प्रशंसनीय कार्य आहे.
    संपुर्ण टिमला शुभेच्छा!/

    डॉ दिलीप धोंडू बडगुजर
    अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*