श्री.परेश चुडामण बडगुजर यांची शिक्षक भारती संघटनेच्या मालेगाव तालुका संपर्कप्रमुख पदी अभिनंदनीय निवड – श्री. शांताराम भिकाशेट बडगुजर, कल्याण

आई प्रतिष्ठानचे संचालक, मालेगाव तालुका जुनी पेंशन हक्क संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री.परेश चुडामण बडगुजर यांची शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्व असलेली “शिक्षक भारती” संघटनेच्या मालेगाव तालुका संपर्कप्रमुख पदी अभिनंदनीय निवड.
शिक्षक भारतीच्या नुतन पदाधिकारी यांना निवड पत्र देऊन राज्य सरचिटणीस भरत शेलार, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, विभागीय कार्याध्यक्ष कैलास पगार, जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील,जेष्ठ नेते सतिष मांडवडे,जिल्हा कार्याध्यक्ष वाल्मिक घरटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
श्री.परेश बडगुजर हे जि.प.शाळा, चिंचगव्हाण ता.मालेगाव,जि.नाशिक येथे शिक्षक आहेत.

श्री परेश बडगुजर हे श्री.चुडामण लोटनशेठ बडगुजर रा.अमळथे (ह.मु.शिंदखेडा) यांचे चिरंजीव आहेत.
श्री.प्रमोद सुरेशशेठ बडगुजर (उमरगाव) व श्री.शांताराम भिकाशेठ बडगुजर (कल्याण) यांचे शालक आहेत.
श्री.चंद्रकांत भिकाशेठ बडगुजर रा.थाळनेर (ह.मु.कळवा) व श्री.ज्ञानेश्वर भिकाशेठ बडगुजर (थाळनेर) यांचे भाचे आहेत.
श्री.सुभाष पंडितशेठ बडगुजर (साकळी) यांचे जावाई आहेत.
श्री.परेश चुडामण बडगुजर यांची शिक्षक भारती संघटनेच्या मालेगाव तालुका संपर्कप्रमुख पदी अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*