धुळे : दि.२०/१२/२०२० रविवार रोजी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आयोजित कार्यकारणी सभेत कोरोना काळातील विशेष कार्य करणाऱ्या समितींचे विशेष नामउल्लेख करून त्यांच्या गौरव करण्यात आला. यात विशेष करून सर्वांचे कौतुकास्पद ठरले ते म्हणजे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात 11 कार्यक्रम राबविण्यात आले. या समाजोपयोगी समाजकार्यांचा अहवाल महासचिव राजेंद्र बडगुजर सर यांनी वाचन केले त्यावर उपाध्यक्ष श्री. भगवानशेठ बडगुजर व मा. अध्यक्ष श्री. उमेशआप्पा करोडपती यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला, तो सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात संमत झाला. तसेच युवक समिती अध्यक्ष श्री. दिलीप बडगुजर यांनी श्री. हितेश मोहकर यांनी 300 समाज बांधवांना फ्रि मध्ये कॉम्प्युटर कोर्सेस(तीन लाख रुपये) उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांंचाही अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच या सभेप्रसंगी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या कार्यकारणीतील ज्या सदस्यांनी कोरोना वर मात केली अशा सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपने केलेली विशेष कार्य :
१. ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फ्री ऑनलाईन कॉम्प्युटर कोर्सेस – सौजन्य : श्री. हितेशभाई मोहकर, डायरेक्टर, डिजीटल क्लास वर्ल्ड अहमदाबाद, गुजरात
२. गरजूंना धान्य वाटप आणि जेवण पाकिट वाटप – जळगांव व पुणे येथे वाटप
३. वकिली क्षेत्रात असलेल्या व्यवसाय संधी विषयक मार्गदर्शन by Advt. श्री. मनोज बडगुजर, मुंबई विभाग,
४. १०/१२ वी नंतर काय करावे याविषयी करिअर मार्गदर्शन पर कार्यक्रम by प्रा. श्री. सुदाम बडगुजर सर, पुणे.
५. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन पर कार्यक्रम मार्गदर्शन by प्रा. मधुकर कोटवे सर, डायरेक्टर, न्यु फ्रेंड्स अकॅडमी, दिल्ली.
६. स्पर्धा परिक्षा सराव परिक्षा मार्गदर्शन पर कार्यक्रम मार्गदर्शन by प्रा. श्री. विक्रांत पालटशाह सर, पुणे.
७. व्यवसाय मार्गदर्शन शिबीर by श्री. सुनिल जाधव सर, मुंबई, प्रसिद्ध बिझनेस कोच, मोटीव्हेशनल स्पिकर, लेखक.
८.सोनशेलू येथे चामुंडा माता ट्रस्ट व आई चामुंडा फौंडेशन, नंदुरबार यांच्या सहकार्याने आर्सेनिक अल्बम च्या गोळ्या वाटप.
९. स्पर्धा परिक्षा ऑनलाईन सराव पेपर परिक्षा (MPSC च्या विद्यार्थ्यांनकरिता).
१०. सेल्फी विथ बाप्पा आणि मखर सजावट स्पर्धा : ऑनलाईन पध्दतीने आयोजन
११. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समिती मार्फत युवकांना रोजगार उपलब्ध करून दिले.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीशी एकरुप राहून, महासमीतीच्या सर्व तत्त्वांचे पालन करुन अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांनी समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे. नवसमाज युवकांना प्रोत्साहित करणाऱ्या या युवकांच्या कार्याला अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीने या सर्वांच्या वतीने अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती प्रमुख, नंदुरबार शहराचे नगरसेवक श्री दिलीप राघोशेठ बडगुजर यांचा विशेष सत्कार केला. त्याबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप आपले सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहोत…….


पर्यावरण पुरक शाळु माती गणेश मूर्ती तयार करणे या उपक्रमाचा सुध्दा समावेश करण्यात यावा