iGNight 3.0 या दिव्यांगाच्या insta व Facebook live show मध्ये कु. रचना बडगुजर सहभाग – कुणाची कमतरता ही त्याची ताकद असू शकते याचे उत्तम उदाहरण – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

कु. रचना सुधाकर बडगुजर ह.मु भोकर जि. जळगाव येथील श्री. सुधाकर अर्जुन बडगुजर व सौ. विजया सुधाकर बडगुजर यांची सुकन्या ही समाजातील तमाम दिव्यांग मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कुमारी रचना बडगुजर हिने iGNight 3.0 या दिव्यांगाच्या insta व Facebook live show मध्ये सहभाग नोंदवत. स्वतःच्या दिव्यांगावर कशी मात करता येते याचे उत्तम उदाहरण प्रस्तुत करीत उत्तम नृत्याचे दर्शन घडविले आहे. iGNight 3.0 या स्पर्धेत नृत्य,गायन, विनोद सादरीकरण, कविता सादरीकरण, व वाद्यकला अशा विविध स्पर्धा दिव्यांग मुला मुलींसाठीसाठी आयोजित केले जातात,दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या live show मध्ये कुमारी रचना सुधाकर बडगुजर हिने सहभाग नोंदवत दिव्यांग मुलांसाठी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. दिनांक 11,12 आणि 13 डिसेंबर रोजी प्रसारित होणार्‍या या लाईव्ह शो मध्ये आपण समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कुमारी रचना बडगुजर हिला यशाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करूया. तिच्या यशाचे हिस्सेदार होऊया. हा कार्यक्रम खालील लिंकवर लाईव्ह स्वरूपात घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी रचना हिस विजयी करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम बघून तिला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट्स कराव्यात.

स्पर्धा विषयी माहिती :
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2670301116617777&id=2074717122842849

व्हिडीओ लिंक :https://m.facebook.com/story.php?story_fbid=2803204363278973&id=100007683094012


कुमारी रचना सुधाकर बडगुजर च्या प्रयत्नांना अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व जय बडगुजर सेना च्या वतीने हार्दिक शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी सदिच्छा.

कुमारी रचना सुधाकर बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*