ऑनलाईन उद्योगाची संधी: Affiliate Marketing (भाग २) BY:- दिनेश भगवान बडगुजर (युवा उद्योजक, शिरपुर)

प्रकार : पूर्ण ऑनलाईन
कॉम्प्युटरचे ज्ञान : मध्यम
गुंतवणूक : नाही
शिकून कमविण्यासाठी वेळ : १-६ आठवडे

मागील भागात आपण Affiliate मार्केटिंगची ओळख करून घेतली. आता त्याची थोडी अधिक माहिती आणि अनेक संधींविषयी घेऊ.

लक्षात ठेवा, ट्रॅफिक (म्हणजे तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगला मिळणारे वाचक) हाच इंटरनेट व्यवसायाचा देव आहे आणि, तुम्ही बनवत असलेले कंटेंट (मजकूर, चित्रे, व्हिडिओ) हा राजा आहे. तुम्हाला जेव्हा भरपूर visitors हवे असतात, तेव्हा तुम्ही एवढा प्रसार, प्रचार करता की गुगलला तुमचा शोध लागतो. आताच्या विषयात, तुम्हाला तुमची affiliate लिंक गुगलवर लोकप्रिय करायची आहे.

ब्लॉग लिहिणे, हे अशाच कामासाठी सुरुवातीपासून सुचवले आहे. तुमच्या आशय, विषयाशी संबंधित महत्वाचे शब्द (keywords) वारंवार असलेला मजकूर तुम्ही बनवावा. म्हणजे ते शब्द शोधणारा वाचक तुमच्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकतो. तो तुमच्या ब्लॉगवर आल्यावर, तुमचा मजकूर, लेख, गोष्ट, कविता वाचून, तो त्यासंबंधी तुम्ही तिथे ठेवलेली affiliate लिंक ही बघतो आणि तिलाही भेट देऊ शकतो. हे अगदी टीव्ही मालिकाप्रमाणे आहे. चांगल्या मालिकेसाठी जास्त प्रेक्षक असतात आणि तिथेच ब्रेकचा माध्यमातून जाहिरातीही दाखवल्या जातात.

तुम्ही विकत असलेले प्रॉडक्ट, सेवा ह्यासंबंधी लिखाण करताना त्या विषयीचे key words ठरवा आणि त्याचा वापर तुमच्या मजकुरात ७-८ वेळा करा. त्यामुळे गुगल शोधामध्ये तुमचा ब्लॉग येऊ शकेल, अर्थात अजून अनेक मार्गांनी तुमचा ब्लॉग प्रसारित करणेही, गरजेचे आहे.

सध्या, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी Clickbank, Amazon, Flipkart ह्यापैकी १-२ निवडा. त्यात नोंदणी करून, त्यातील प्रॉडक्ट, सेवांचे प्रकार आणि त्या खाली येणारी प्रॉडक्ट पाहा. शेकडो प्रॉडक्टचे प्रकार आणि पर्याय आहेत. क्लिकबँक हे डिजिटल प्रॉडक्ट्स विकते, त्याचे कमीशन ८०% पर्यंतसुद्धा असते. अमेझॉन, फ्लिपकार्ट हे घरगुती वापरातील वस्तू पासून, electronic वस्तु , वस्त्र प्रावरणे, कपडे, पुस्तके इत्यादी हजारो वस्तू विकतात. ते १-१५ टक्के कमिशन देतात.

✅ विषयानुसार अनेक प्रकारचे भरपूर affiliate marketing पर्याय खालीलप्रमाणे आहेत :

Mixed product affiliate networks:

Clixgalore.co.in
Vcommission.com
Maxbounty.com


Domain, Hosting related:

Godaddy.com
Hostgator.com
WordPress.com
Bigrock.com


Travel, Hotel, Trips related:

Tripadvisor.com
Travelguru.com
Redbus.com
Yatra.com


Job/placement related:

Monster.com
Naukri.com
Fiverr.com


Matrimonial:

Shadi.com
Jeevansathi.com


Banking and finance:

ICICI bank referral
HDFC Bank affiliate
Religare trading affiliate
Iforex trading


Health related:

Medlife.com
Healthkart.com


Educational/Courses:

Udemy.com
Coursera.com

आणखीही भरपूर आहेत. पण, सध्या १-२ पर्याय निवडा, त्यावर मजकूर बनवणे आणि प्रचाराची पद्धत, तंत्रे पूर्ण समजून ती वापरणे शिका आणि त्यात यश मिळाल्यावर फक्त ती पद्धत इतर अनेक प्रॉडक्टसाठी कॉपी करा.

✅ इंटरनेट व्यवसायाची सुंदरता आणि खुबी पाहा. तुमच्या मजकूर आणि affiliate लिंकपर्यंत इंटरनेट वापरकर्ता जगभरातून पोहोचू शकतो, त्याला आवडल्यास तो तुमचे प्रॉडक्ट खरेदी करतो, पैसे देतो, कंपनी त्याला प्रॉडक्ट पोहोचवते, तुमच्या दखल न घेता, तुमच्या अपरोक्ष, तेही २४ x ७ x ३६५. म्हणून आम्ही म्हणतो, तुमच्या इंटरनेट व्यवसायातून तुम्ही पैसे कमावू शकता, तुम्ही झोपलेले असतानासुद्धा

मग विचार करतात काय आजच Affiliate marketing करायला सुरवात करा…….

BY:- दिनेश भगवान बडगुजर (युवा उद्योजक, शिरपूर)

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*