
राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुऱ्हे पानाचे येथील कै. दादासाहेब राजाराम धोंडूशेठ बडगुजर यांनी 1956 साली गावाच्या विकासासाठी व कल्याणासाठी ज्ञानगंगा सुरू केली. पाहता पाहता अंकुराचा आज वटवृक्ष झाला असून, या शाळेत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले जातात. समाजातील विविध विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आपले नांव लौकिक मिळवित आहेत. शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री. एकनाथ रावजी बडगुजर यांनी सन 2000 साली संस्थेची धुरा हातात घेतली व शाळेचा विकासासाठी कधी न थकणार… समाजासाठी झटणार.. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आप्पासाहेब एकनाथ रावजी बडगुजर अप्पासाहेबांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात एक भव्य दिव्य अशी प्रशस्त इमारत निर्माण केली व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रोजेक्ट आणलेत. माझी शाळा आदर्श शाळा याप्रमाणे शाळेतील शिक्षक सुद्धा विविध उपक्रम राबवत असतात. आदरणीय सुदर्शन बडगुजर, हेमंत बडगुजर, अरविंद बडगुजर, नंदलाल मोहकर, डी. डी .पाटील गवळी सर, सुनिल कोतवाल, असे नामांकित व्यक्ती शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यतत्पर असतात. याच बरोबर गावात महात्मा गांधी छात्रालय उभारून गोरगरिबांचे120 विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात. आमचे सर्वांचे प्रेरणास्थान माननीय आप्पासाहेब एकनाथ रावजी बडगुजर.यांचा 67 वा वाढदिवस यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. व पुढील जीवन आरोग्यमय व सुख-समृद्धीमय जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

ए एक मुखाने नाव काढावे असे आपले लाडके.
क करितो आम्ही त्यांचा 67 वाढदिवस साजरे. व्यक्तिमत्व आहे मोठे सत्व.
ना नामवंत असे एक व्यक्तिमत्व आमचे मोठे सत्व
थ थकवा जाणवेल दुसऱ्यासाठी आपले देह झिजवे.
रा राजाराम शेठ यांचे ज्येष्ठ पुत्र कीर्ती यांची सर्वत्र.
व वर्चस्व सदा समाज कल्याणासाठी ज्ञानगंगा विकासासाठी….
श्री. एकनाथआप्पा राजारामशेठ बडगुजर यांना ६७ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply