अभियंता ते महिला उद्योजक प्रवास, शिरपुर च्या मराठी मुलीने वाजवला मुंबईत डंका, सौ.अनामिका तुषार बडगुजर यांनी उभारली पारंपरिक गुळाचा चहाची स्वतःची कंपनी. BY: दिनेश भगवान बडगुजर (युवा उद्योजक,शिरपुर)

अभियंता ते महिला उद्योजक प्रवास, शिरपुर च्या मराठी मुलीने वाजवला मुंबई (बदलापूर) मध्ये डंका ,सौ.अनामिका तुषार बडगुजर यांनी उभारली पारंपरिक गुळाचा चहाची स्वतःची कंपनी. “पारंपरिक गुळाचा चहा” (आरोग्य जपणारा पारंपरिक गुळाचा चहा) कोण म्हणते मराठी माणूस पुढे जात नाही जिद्द आणि चिकाटी असली कि नक्की पुढे जातो, पण ह्यावेळेस संकल्पना आपण बदलली पाहिजे, आता मराठी महिला सुद्धा पुढे जाऊ शकतात. ह्या संकल्पनेतून सौ अनामिका तुषार बडगुजर ह्यांनी दाखवून दिले आहे.

सौ. अनामिका तुषार बडगुजर याचे कौतुक करावं तेवढं कमी आहे , स्वतःच्या हिंमतीवर व श्री. तुषार सुरेश बडगुजर आपल्या जीवनसाथी याच्या आणि संपूर्ण परिवाराच्या साह्याने आज मुंबई मध्ये (बदलापूरला ) स्वतःची कंपनी उभारली आहे , COVID-19 च्या प्रकोप ने दिवसेंदिवस सामान्य व्यक्तीवर नौकरी वरून काढणे आणि व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे. ह्या सर्व गोष्टींना सामोरून जाऊन सौ. अनामिका बडगुजर यांनी स्वतःची युक्ती लढवली व कंपनी उभारली.

पारंपरिक गुळाचा चहा

कोरोना च्या पार्श्वभूमीवर मनुष्याला आरोग्य टिकवणे फार महत्वाचे झालेले आहे. ह्याची संकल्पना घेऊन सौ.अनामिका यांनी पारंपरिक गुळाचा चहा हि संकल्पना प्रत्यक्षात उभी केली. आरोग्य जपणारी संकल्पना उत्तम पारंपरिक गुळाचा चहा, आपले पूर्वज पहिले गुळचाच चहा प्यायचे, म्हणून त्याचे आरोग्य नेहमी तंदरुस्त व जास्त आयुष्य जगायचे, गुळाच्या चहाने आरोग्य संतुलित राहायचे. गुळाच्या चहाचे फायदे.

सौ.अनामिका बडगुजर याचे Government polytechnic dhule येथून Mechanical engineering Diploma मध्ये शिक्षण झालेले आहे. लग्नानंतर त्यांनी Private Company मध्ये नौकरी केली. पण सौ.अनामिका याना काहीतरी करून दाखवायचं जिद्द होती. काही वर्ष त्यांनी नौकरी केली पण, नंतर कोरोना -१९ हा जागतिक महामारी ने सर्वाना झोकुन दिलेलं होते, आरोग्य टिकवणे महत्वाचे झालेलं होते. ह्याच पार्श्वभूमीवर स्वतःच दि. ११ नोव्हे. २०२० रोजी आपला “BRAND” सुरु केला. व पारंपरिक गुळाचा चहा हि कल्पना अस्तित्वात आणली व आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात सुरवात केली. कोण म्हणते मराठी माणूस पुढे जात नाही जिद्द आणि चिकाटी असली कि नक्की पुढे जातो, पण ह्यावेळेस संकप्लना आपण बदलली पाहिजे, आता मराठी महिला सुद्धा पुढे जाऊ शकतात. ह्या संकल्पनेतून सौ अनामिका ह्यांनी दाखवून दिले आहे. श्री. तुषार सुरेश बडगुजर (बदलापूर) ह्याच्या त्या धर्मपत्नी आहेत श्री. सुरेश तुकाराम बडगुजर, सासरे (जळगाव) सौ.सुनंदा सुरेश बडगुजर ,सासु श्री.शामकांत गोविंदा बडगुजर, वडील (शिरपूर) सौ.लक्ष्मी शामकांत बडगुजर (आई) चि.मुकेश शामकांत बडगुजर भाऊ (शिरपूर), श्री.मनोज मारुती बडगुजर मावसा (ठाणे)

उदघाटन सोहळा दि. ११ नोव्हे.२०२० रोजी करण्यात आला आहे. पारंपरिक गुळाचा चहा ह्या नवीन दालनाचे उदघाटन मा.किसन कथोरे साहेब (आमदार मुरबाड विधानसभा क्षेत्र) याच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित पाहुणे. मा. राजन घोरपडे साहेब (मा. नगराध्यक्ष तथा नगरसेवक) मा. संजय भोईर साहेब (बीजेपी शहर अध्यक्ष तथा नगरसेवक) मा. शरद तेली साहेब (मा. नगराध्यक्ष तथा नगरसेवक) मा.उल्हास आंबवणे साहेब (शिवसेना विभागपरमुख) याच्या उपस्थितीत झाला आहे. आणि बडगुजर समाजातील वरिष्ठ मान्यवर देखील उपस्थित होते, ह्या सर्वानी सौ.अनामिका तुषार बडगुजर ह्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भावी वाटचालीसाठी बडगुजर प्राउड टीम कडून खुप खुप शुभेच्छा

टीप : बडगुजर समाजातील बांधवाना नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर पारंपरिक गुळाचा चहा ह्याची संपूर्ण महाराष्ट्रात फ्रॅन्चाइसी देण्याची सुरवात करण्यात आली आहे. तरी ज्यांना हा व्यवसाय सुरु करायचा असले त्यांनी सौ. अनामिका बडगुजर ह्याच्याशी संपर्क साधायचा MOBILE NO. 9561964395

श्री. अरुण बडगुजर व सौ. नंदिनी अरुण बडगुजर शुभेच्छा देताना
सौ. अनामिका तुषार बडगुजर
(CEO)

पारंपरिक गुळाचा चहा

BY: दिनेश भगवान बडगुजर (युवा उद्योजक शिरपूर)

Leave a Reply

Your email address will not be published.


*