जळगाव येथील कु. ऐश्वर्या परशुराम बडगुजर, ही उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगांंव येथुन नुकतीच M.B.A. फायनलची परीक्षा ७८ टक्क्यांनी First Class With Distinction मध्ये पास
झालेली आहे. तिचे उत्तर महाराष्ट्र विदयापीठातील सर्व शिक्षकांनी कौतुक व अभिनंदन केलेले आहे. तसेच कु. ऐश्वर्या परशुराम बडगुजर, हिची नुकतीच जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट, जळगाव येथे ज्यु. कॉलेज ला प्राध्यापक म्हणुन देखील निवड झालेली आहे.
कु. ऐश्वर्या हि जळगांव येथील श्री. परशुराम सखाराम बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते व सौ.ज्योतीताई परशुराम बडगुजर, बडगुजर विदया प्रसारक मंडळ च्या सह सचिव व अखिल भारतीय
बडगुजर महासमिती कार्यकारणी सदस्या यांची मुलगी आहे. तिने संपादीत केलेल्या घवघवीत यशा बद्दल तिचे बडगुजर विदयाप्रसारक मंडळ जळगांव चे अध्यक्ष व सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या वतीने अभिनंद व कौतुक केले जात आहे. कु. ऐश्वर्या हिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल आणि प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तिचे अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.


Congratulations
खूप खूप हार्दिक अभिनंदन ,भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
ताई तुझ कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.फार लहान वयात मिळवलेले यश आणि घेतलेली जबाबदारी कौतुकास्पद आहे.पुढील वाटचालीसाठी तूला हार्दिक शुभेच्छा.रवि कोतवाल आणि परीवार.
कुर्हे पानाचे. ह.मु.भुसावळ.
Hearty Congratulations Aishwarya.
Wish you a very happy and prosperous future life. All the best for your future assignment.