आजोबा कै.निबा बडगुजर चोपडा व काकाच्या प्रेरणेने यांचा वारसा म्हणून काही तरी करण्याची जिद्द, चिकाटी, मोठ्या शहरात नोकरी करण्या पेक्षा आपण स्वतःचा उद्योग सुरु करावा,लहान पणा पासून घरातील मोठे काका श्री.अरुण निंबा बडगुजर यांचे फर्म न्यु फेमस इंजिनियरिंग वर्क्स, श्री.राजेंद्र निंबा बडगुजर यांचे फर्म वैभय अग्रो इंडस्ट्रीज व लहान काका श्री.नरेंद्र (छोटू) निंबा बडगुजर या सर्व फर्मचा अनुभव घेऊन, चोपडा येथील समाज बांधव सुप्रसिद्ध वकील श्री.सुनिल निंबा बडगुजर यांचा मुलगा चि.गौरव सुनिल बडगुजर यांच्या ‘गौरव ट्रेडर्स ‘ चे सोमवार दि.१६/११/२०२० रोजी उद्धघाटन झाले,
यांत सर्व प्रकारचे विविध शेतीला लागणारे ट्रॅक्टर ट्राली, थ्रेशर, रोटा, ट्रिलर, पेरणी यंत्राचे स्पेअर पार्ट्स, वेल्डिंग रॉड, नट बोल्ट व शेती विषयक उपयुक्त सर्व प्रकारचे अवजारे मिळतील.या दुकानाचे उद्घाटन फेमस इंजिनिअरिंग वर्क्स ,चोपडाचे संचालक काका श्री.अरुण निंबा बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
व कार्यक्रम प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष मा. श्री.अरुणभाई गुजराथी ही उपस्थित होते, चोपडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा.श्री.
जीवन चौधरी हे ही उपस्थित होते व यांनी “गौरव ट्रेडर्स” चे संचालक चि.गौरव बडगुजर यांचा शाल ,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच नामांकित वकील श्री.जी.के.आबा पाटील, मान्यवर, आप्तेष्ट मंडळी, व्यापारी मंडळी उपस्थित होती.सर्वांनी गौरव ट्रेडर्स चे संचालक चि.गौरव सुनिल बडगुजर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालिस हार्दिक शुभेच्छा दिल्या.






गौरव बडगुजर ( चोपडा )च्या ,” गौरव ट्रेडर्स ” च्या शुभारंभास हार्दिक शुभेच्छा ! व स्वत:चा उधोग सुरू केलेल्या बध्दल हार्दिक अभिनंदन !
यशस्वी भव:!
अभिनंदन गौरव
दिपक पवार
औरंगाबाद (म्हसवाद)