कु.पुजा लिलाधर बडगुजर हिचे इंजिनिअरिग परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

विद्या प्रसारक मंडळ जळगाव चे अध्यक्ष श्री लीलाधर दत्तात्रय बडगुजर यांची कन्या कु. पूजा लिलाधर बडगुजर हिने B.E. इलेक्ट्रिकल च्या फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट च्या सर्व शाखांमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवुन यश संपादन केले आहे. लहानपणापासूनच कु.पूजा ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ती गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले होते. इयत्ता दहावीला 96% गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक मधूनही इलेक्ट्रिकल डिप्लोमा परिक्षेत जिल्ह्यांमधून सर्व मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता व पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट मधूनही सर्व शाखा मध्ये मागील तीनही वर्ष ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आह.तिसऱ्या वर्षाच्या मेरिट लिस्ट मध्येही पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ला ती सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिच्या यशात तिचे वडील श्री. लीलाधर दत्तात्रय बडगुजर व आई भावना, आजोबा श्री दत्तात्रेय बाजीराव बडगुजर, आजी शकुंतला बडगुजर व काका रवींद्र बडगुजर, प्रा.दिपक बडगुजर व काकू प्रा.मनीषा बडगुजर यांचा फार मोठा हातभार आहे. भविष्यात तिला स्पर्धात्मक परीक्षा देऊन आपले करिअर करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे .कु.पूजास उज्वल भविष्याकरीता विद्याप्रसारक मंडळ जळगांव,अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्रॉउड ग्रुप , वेब पोर्टल टीम व बडगुजर समाज मंडळ फागणे बाळापूर यांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*