
शिरपूरच्या मुकेश बडगुजरची डब्ल्यू. के. ए. टेक्नॉलॉजी मुंबई कंपनीत निवड
आर. सी. पटेल एज्युकेशन ट्रस्ट संचलित आय. एम. आर. डी. च्या एम सी. ए. अभ्यासक्रमातील मुकेश बडगुजर या विद्यार्थीची डब्ल्यू. के. ए. टेक्नॉलॉजी सायन, आय. आय टी. मुंबई या कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड झाली. सदर कॅम्पस इंटरव्ह्यू दि. १० ऑगस्ट २०२० रोजी या कंपनीचे सीईअाे डॉ. राजेंद्र सोनार यांनी घेतला. अंतिम वर्षीय एम.सी.ए. याविद्यार्थ्यासाठी ऑनलाईन पद्धतीने टेक्निकल टेस्ट घेण्यात आली. या टेक्निकल टेस्ट मध्ये डॉ. राजेंद्र सोनार यांनी दिलेल्या सर्व टेक्निकल असाइनमेंट मुकेश बडगुजर ( इंटीग्रेटेड एम.सी.ए. पाचवे वर्ष) याने उत्कृष्ट पद्धतीने सोडवल्या म्हणून मुकेश बडगुजर ची त्यांच्या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदासाठी निवड केली. या कोविड-१९ च्या भिषण परिस्थितीमध्ये सुद्धा आय.एम. आर.डी. परिसंस्था व परिसंस्थेतील ट्रेनिंग प्लेसमेंट
विभाग आपल्या विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत असते. परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली प्लेसमेंट चे आयोजन ट्रेनिंग प्लेसमेंट
ऑफिसर प्रा. अर्चना जडे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समितीने केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक माजी मंत्री अमरिशभाई पटेल, संस्थेचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, चेअरमन राजगोपाल भंडारी , सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू के. बी. पाटील, परिसंस्थेचे साचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा. मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभागप्रमुखमनोज पटेल, पदवी विभागप्रमुख प्रा. तुषार पटेल यांनी केले. प्रा. मनोज सोनवणे, प्रा. सुमित बिडे, प्रा. विजया अहिरे, प्रा. स्वप्नील गोजे, प्रा अमित पाटील, प्रा. विशाल पवार, प्रा. छाया पाटील, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. रोहिणी पाटील, प्रा. सपना रघुवंशी या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
BY : दिनेश बडगुजर (युवा उद्योजक, शिरपूर)

Leave a Reply