श्री.गिरीश बडगुजर यांची भुसावळ तालुक्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तींच्या सल्ला व मार्गदर्शन कक्ष येथे कक्षपरिचर म्हणून निवड – श्री. विनोद श्रीराम मोहकर पुणे

श्री.गिरीश सुभाष बडगुजर यांची भुसावळ तालुक्या साठी सदर दिव्यांग व्यक्तींच्या सल्ला व मार्गदर्शन कक्ष येथे कक्षपरिचर म्हणून निवड करण्यात आली आहे. राहणार जळगांव शिक्षण ATD,BFA(ptg.),AM.,CTC.नोकरी- विवेकानंद प्रतिष्ठान जळगांव संचलित, श्रवण विकास मंदिर, कर्णबधिर मुलांसाठी शाळा, सावखेडा बुद्रुक, गिरणा पंपिंग रोड, जळगांव येथे वीस वर्षापासून कला शिक्षक या पदावर कार्यरत आहे.
श्री. सुभाष रामचंद्र बडगुजर रा.नाशिक व सौ.नलिनी सुभाष बडगुजर यांचा मुलगा,धर्मपत्नी सौ.शुभांगी ह्या housewife आहे त्यांचे शिक्षण हे Bsc.comp व मुलगा -चि.देवाशिष हा नववी मध्ये शिकत आहे. व श्री. कैलास बडगुजर हे लहान भाऊ व हे नाशिक येथे स्थायिक असून ते लोकमत कार्यालय अंबड शाखा येथे शाखाधिकारी (सर्क्युलर डिपार्टमेंट)म्हणून कार्यरत आहेत.असा माझा परिवार आहे.
सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणे, घडविणे एक वेळेस सहज शक्य होते. मात्र दिव्यांग मुलांना शिक्षण देणे, उत्तम नागरिक म्हणून समाजात घडविणे, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे एक दिव्य ठरते. येथे खऱ्या अर्थाने शिक्षकाचा कसा लागत असतो.दिव्यांग मुलांच्या बाबतीत शिक्षकाकडे पेशंस असणे खूप महत्त्वपूर्ण ठरते.शिक्षकाच्या अंगी सहनशील वृत्ती दिव्यांग मुलांविषयी प्रेम व आवड तसेच चिकाटी व जिद्द हे गुण असतील तरच तो शिक्षक दिव्यांग मुलांच्या शिक्षणाच्या कसोटीत पात्र ठरतो.आज समाजात माणुसकी हरवत चालली आहे. दिव्यांग व्यक्ती म्हणजे समाजाच्या दृष्टीने एक दुर्लक्षित घटक असा समजला जातो.
सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत दिव्यांग मुलांची हेटाळणी केली जाते. त्यांच्यातील बौद्धिक,शारीरिक कमतरता,पंगू पणामुळे त्याला कमी लेखले जाते.तेव्हा गरज आहे दिव्यांग व्यक्तींना समजून घेण्याची, त्यांना प्रेम देण्याची, त्यांच्या मानसिकतेला, भावनांना समजून घेण्याची. नेमका हाच धागा पकडून सुमारे वीस वर्षा पूर्वी नाशिक येथील रहिवास सोडून, पुणे-मुंबई येथील चांगल्या नोकरीचा आलेला कॉल सोडून खान्देशातील जळगांव येथे कर्मभूमी म्हणून विवेकानंद प्रतिष्ठान या संस्थेशी, तेथील कर्णबधिर शाळेशी नाळ जोडून घेतली. त्याला कारण ही तसेच ठरले.
लहानपणा पासून असलेली शिक्षकी पेशाची आवड तसेच दिव्यांग व्यक्तीच्या जीवना विषयी असलेली तळमळ व शिक्षकी पेशाच्या माध्यमातून समाज सेवेची आवड हे होय. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जळगांव येथील दिव्यांग कर्णबधिर (मूक व बधिर) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून सुजाण नागरिक म्हणून घडविण्याचा ध्यास अंगी बांधला आहे. येथील कर्णबधीर विद्यार्थी आज कलेच्या माध्यमातून चांगल्या रीतीने पारंगत होत आहेत. राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर देखील येथील विद्यार्थी आपली गुणवत्ता दरवर्षी सिद्ध करीत असतात. त्यांच्या यशाचा आलेख हा सतत वाढत आहे. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थी निपुण होत आहेत. याची पोचपावती म्हणजे आतापर्यंत दोन वेळा आदर्श शिक्षकाचा पुरस्काराने रोटरी क्लब व लायन्स क्लब यांच्यामार्फत गौरविण्यात आले आहे.
जळगांवात सावखेडा येथे गिरणा पंपिंग रोड जवळ,मातोश्री वृद्धाश्रम शेजारी श्रवण विकास मंदिर या कर्णबधिर विद्यालयात आज बालवाडी पासून ते दहावी पर्यंत शिक्षणाची उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध आहे. कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थ्यां करीता विशेष शिक्षणाची सोय असून अद्यावत सर्व तंत्रज्ञान युक्त साऊंडप्रूफ रूम व FM system द्वारे शिक्षण व्यवस्था, आधुनिक कर्ण यंत्र वगैरे यांची देखील शाळेमार्फत मोफत सुविधा पुरविण्यात येते. कर्णबधिर प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता खान्देशातील हि शाळा एक संजीवनी म्हणण्यास हरकत नाही. येथील शिक्षण हे पूर्णतः मोफत असून
विद्यार्थ्यांकरीता जळगांव शहरातील कानाकोपर्‍यातून येण्याकरीता स्कूलबसची देखील मोफत सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. त्या शिवाय चाळीस विद्यार्थी येथे वस्तीगृहात विना खर्च राहतात. एकंदर दिव्यांग विद्यार्थी हा शिक्षणा पासून वंचित राहू नये हाच संस्थेचा एकमेव मूळ उद्देश आहे. सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या वतीने नुकतेच प्रत्येक जिल्ह्यातील तालुका अंतर्गत पंचायत समिती मध्ये दिव्यांग अधिनियम कायदा 2016 कलम 25 अन्वये दिव्यांग व्यक्तींकरिता सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेमधील एका शिक्षकांची नियुक्ती पंचायत समिती मध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्या मध्ये पंचायत समिती कार्यालय अंतर्गत स्वतंत्ररीत्या दिव्यांग व्यक्तीं करीता शासनाच्या आदेशाने दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आला असून फक्त बुधवारी येथे दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना,UDID (UNIQUE DISABILITY IDENTITY CARD) तसेच सल्ला मार्गदर्शन करण्यात येते. अभिमानाची गोष्ट म्हणजे माझी नुकतीच भुसावळ तालुक्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तींच्या सल्ला व मार्गदर्शन कक्ष येथे कक्षपरिचर म्हणून निवड करण्यात आली आहे.
आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

2 Comments

  1. आपणा सर्वांचे मनस्वी धन्यवाद,आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मुळे समाजातील तळागाळातील दिव्यांग व्यक्ती करिता कलेच्या माध्यमातून अधिक काम करण्याची नवीन ऊर्जा व प्रेरणा नक्कीच मिळत राहील यात शंका नाही.

  2. गिरीशभाऊ आपल्या निवडीबद्दल अभिनंदन.भुसावल नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे…

    रविंद्र दामोदर कोतवाल.
    भुसावळ.

Leave a Reply

Your email address will not be published.


*