बडगुजर समाजातील एक तेजस्वी तारा निखळला… स्व. आण्णासाहेब नथ्थु नामदेव बडगुजर यांना विनम्र अभिवादन – श्री. रविंद्र दयाराम बडगुजर, शिरपूर

अवघ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे सर्वमान्य नेतृत्व स्वर्गीय अण्णासाहेब नथू नामदेव बडगुजर यांची 23 ऑक्टोबर 2020 रोजी अल्पशा आजाराने प्राणज्योत मावळली याचे समजले जणूकाही आपला हक्काचा मार्गदर्शक देवाने हिरावून नेला अशी भावना निर्माण झाली.

असे म्हणतात की माणसाने असे जगावे की इतिहासाने त्यासाठी एक सुवर्णपान राखावे याच उक्तीप्रमाणे स्वर्गीय अण्णांचे व्यक्तिमत्व होते अखिल भारतीय बहुजन समाजाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो इतिहास स्वर्गीय अण्णांची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही अण्णांसाठी नक्कीच एक नव्हे तर अनेक सुवर्ण पाने राखून ठेवावी लागतील.

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम बोराडी सारख्या गावात स्वतः अण्णासो व्यंकटरावजी रणधीर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन गावातील व शिरपूर तालुक्यातील समाजात शिक्षणाचे महत्व पटवून देऊन अनेकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करून स्वतःच्या पायावर उभे केले. समाजकार्याची दखल घेत स्वर्गीय अण्णांना अनेक महत्त्वाची पदे देण्यात आली व ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यामुळे समाजबांधवांच्या हृदयात माणुसकीचे घरटे निर्माण केले. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजात परिवर्तन घडवून समतेचे दीप प्रज्वलित करुन विधायक वाटेवर चालण्यासाठी ते नेहमी समाजबांधवांना प्रेरित करत असत.

समाजातील नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची ताकद त्यांच्या विचारांमध्ये होती जेव्हा जेव्हा समाजाला एक दिशा देण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा त्यांनी विचारांच्या माध्यमातून समाजाला एक नवीदिशा दिली.

स्वर्गीय अण्णा समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर राहत असत. आज त्यांच्या जाण्याने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भविष्यात प्रत्येक कार्यक्रम प्रसंगी त्यांचे दिपस्तंभासारखी दृष्टी देणारे समाजकार्य आपल्याला आठवण करून देईल. सामाजिक बांधिलकीची जाण असलेले नेतृत्व म्हणजे स्वर्गीय आण्णा.

संपूर्ण महाराष्ट्राच्या कोणत्याही गावात सामाजिक कार्यक्रमात कार्यक्रम पत्रिका प्राप्त झाल्यास स्वर्गीय यांना त्या कार्यक्रमाला आवर्जून वेळेत उपस्थित राहत. त्यामुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचा गोतावळा वाढत गेला. यामुळे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक समाजबांधवांची ते आवर्जून भेट घेत असत. त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना मार्गदर्शन व दिलासा देत असत. या विशाल वटवृक्षाने समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विश्वास संपादन केला.

आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी निष्ठेने समर्पित भावनेने व्यासंगी वृत्तीने कार्य केले एक कुशल जानकार समाजासाठी उर्जितावस्था प्राप्त करून देणारे सहृदय राष्ट्रीय समाज मान्य नेतृत्व आपल्यातून कायमचे निघून गेले.

स्वर्गीय अण्णांना सांगावेसे वाटते की…

आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही ।
अथक प्रयत्नांनी माणूस घडवलीत तुम्ही ।
सर्वांच्या हृदयावर राज्य केलंत तुम्ही ।
आपुलकीचा आधारस्तंभ होता तुम्ही । शेवटच्या श्वासापर्यंत माणसं जपलीत तुम्ही ।
म्हणून देवाला सुद्धा आवडला तुम्ही ।

एक दिवस असा आला …
सर्वकाही घेऊन गेला …

ओळखीच्या वाटेवर केवळ ठेवून गेला तुम्ही ।।

तरी आलो ने परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखात समस्त शिरपूर बडगुजर समाज सहभागी आहोत. स्वर्गीय आण्णांच्या मृतात्म्यास सदगती मिळो हीच प्रभु चरणी प्रार्थना.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*